Sugarcane Crushing Season 2026 Maharashtra: राज्य सरकारच्या निर्णयानुसार, आजपासून ऊस गाळप हंगाम सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत 'काटा बंद' आंदोलन सरु केले आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी आज (दि. १५ ऑक्टोबर) कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. .कारखान्याबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कारखान्याचे गाळप बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऊस दर प्रश्नी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज कराडमधील कृष्णा कारखान्याबाहेर दाखल झाले. कृष्णा कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा ५० हजारांवर सभासद संख्या असलेला कारखाना आहे. .Sugarcane Crushing Season: ऊस हंगामास आजपासून प्रारंभ; शेतकरी संघटनांची हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी.यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांनी प्रतिटन ५ हजार रुपये दर द्यावा आणि केंद्र सरकारकडून ५०० रुपये अनुदान देण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे. यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या साखर कारखान्यांचे वजनकाटे बंद करण्यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार आजपासून त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. .Sugarcane Farmers Protest: उद्यापासून कारखाने बंद पाडणार; राजू शेट्टींचा इशारा, पुणे- बंगळूर महामार्गावरील आंदोलन स्थगित.साखरेची एमएसपी, इथेनॉल दरवाढ आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी त्यांनी पुणे- बंगळूर महामार्गावर ३२ तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेट्टी यांनी आंदोलनाची दिशा बदलत आता साखर कारखाने बंद करण्याचे आंदोलन सुरु केले आहे. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज कृष्णा कारखान्याबाहेर दाखल झाले. .ऊस दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याचा आरोपसातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार तसेच ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला घाबरून ऊस दर जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला. त्यासाठी या कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी आजपासून 'काटा बंद' आंदोलन करण्यात येईल. हे सर्व साखर कारखाने बंद पाडून ऊसतोड रोखली जाईल. दोन दिवसांनंतर सर्व कार्यकर्ते हुबळी येथील पदयात्रेत सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.