Shetkari Karjmafi : बीड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत तिसरी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात थकीत पीक कर्ज असलेल्या ४५०१५ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे प्रशासनाने कळविले आहे..या योजनेच्या पहिल्या यादीत बीड जिल्ह्यातील ९६५२३ आणि दुसऱ्या यादीत ५७७३२ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत पीककर्ज असलेल्या एकूण १९९२७० शेतकऱ्यांची यादी शासनाने प्रसिद्ध केली. या याद्या संबंधित ग्रामपंचायत, सेवा सहकारी संस्था आणि बँकांच्या शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. .Drought Situation: ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या’.१३ ऑक्टोबरपर्यंत या यादीतील १२९०४९ शेतकऱ्यांनी आधार केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या काळात वाटप झालेले, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकी असलेले आणि ३१ मार्च २०२६ रोजी कर्जबाकी असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. .Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य.तसेच राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी दोन लाखांपेक्षा जास्त असली तरी, शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही कर्जे निरंक केली जाणार आहेत. योजनेतील मयत झालेले, वयस्कर किंवा बोटांचे ठसे उमटत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली देखील निर्गमित केली आहे..७०२२१ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकीआतापर्यंत प्रसिद्ध याद्यांमध्ये एकूण १९९२७० राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १२९०४९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून, उर्वरित ७०,२२१ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.