Sthalanatarit Pakshi Maharashtra: खारघर येथील बेलपाडा मैदानावर मंगळवारी (ता. १३) ‘हुपू’ (हुदहुद) या आकर्षक पक्ष्यांचा थवा दिसून आला. Birdsया थव्यामध्ये सुमारे आठ ते दहा हुपू पक्षी एकत्र पाहायला मिळाले. एरवी बहुतांश वेळा एकाकी आढळणाऱ्या या पक्षांचा असा मोठा थवा एकत्र दिसणे, हा पक्षीप्रेमी आणि स्थानिकांसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि नयनरम्य अनुभव ठरला..खारघरमधील बेलपाडा गावाजवळ असलेल्या मैदानावर सकाळच्या वेळी क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी खेळाडू व क्रीडाप्रेमी येतात. नेहमीप्रमाणे खेळाचा सराव सुरू असताना मैदानाच्या एका बाजूला हुपू पक्षी हिरव्या गवतात कीटक व कृमी शोधण्यात पूर्णपणे मग्न होते..Migratory Birds: नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात ‘रोहित’ पाहुण्यांचे आगमन.डोक्यावरील तुरा आणि अंगावरील काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांमुळे या पक्ष्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे तेथे उपस्थितांना सौंदर्यपूर्ण पक्ष्यांचे निरीक्षण करता आले..Migratory Birds: पाणवठ्यांवर सातासमुद्रापारचे पाहुणे दाखल.वैशिष्ट्येपिवळसर तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या शेपटी, पाठ व पंखांवर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. त्याच्या लांब चोचीला जमिनीच्या दिशेने मंद बक असतो. तसेच, शेंडीसारखा तुरा लक्ष वेधून घेतो..हा पक्षी फेब्रुवारी ते मे यादरम्यान झाडाच्या खोडात असलेल्या भोकात किंवा पडक्या घरात छपराखाली असलेल्या सापटीत घरटे करतो.हा पक्षी ‘हु-पो-पो, हु-पो-पो, असा आवाज काढतो म्हणून त्याला हुपू म्हणतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.