Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : पीक स्पर्धेत म्हातले, कडाळी, बांदल, खोपकर यांची बाजी

Result of Crop Competition : कृषी विभागाने गेल्या खरीप हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीकस्पर्धांचा निकाल मंगळवारी (ता. १६) जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागाने गेल्या खरीप हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीकस्पर्धांचा निकाल मंगळवारी (ता. १६) जाहीर झाला आहे. या स्पर्धेत विविध पिकांमध्ये चंद्रकांत म्हातले, शेवंताबाई कडाळी, ताराबाई बांदल तसेच बाळासाहेब खोपकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली आहे.

राज्यस्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीची अंतिम बैठक कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. त्यानंतर निकालावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी चंद्रकांत रघुनाथ म्हातले यांनी तर भात उत्पादनात आदिवासी गटामध्‍ये श्रीमती शेवंताबाई काशिनाथ कडाळी यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. बाजरीच्या सर्वसाधारण गटामध्‍ये पुणे जिल्ह्याच्या श्रीमती ताराबाई दौलत बांदल यांनी, तर सोयाबीन सर्वसाधारण गटामध्‍ये कोल्‍हापूरच्या बाळासाहेब पंडितराव खोपकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल अशा ११ पिकांसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. तालुक्याची उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. राज्यात प्रथम आलेल्या शेतकऱ्यांना बक्षिसापोटी ५० हजार रुपये मिळतील. स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला ४० हजार रुपये; तर तृतीय क्रमांक विजेत्याला ३० हजार रुपये मिळणार आहेत. विजेत्या शेतकऱ्यांचे कृषी आयुक्तांनी अभिनंदन केले असून, पुढील प्रयोगशील शेतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

पीकनिहाय राज्य पातळीवरील (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय विजेते, हेक्टरी उत्पादन क्विंटलमध्ये)

ज्वारी : (सर्वसाधारण गट) - अशोक तायडे (रायपूर, जळगाव, ४५), कुंदनकुमार चौधरी (विवरे खुर्द, जळगाव, ३५), शकुंतला साखरे (फोनसळ, सोलापूर, ३२.०७) (आदिवासी गट) - झुजऱ्या पाडवी (कोठार नंदूरबार, ४१.८१), लक्ष्मण बागूल (काळंबा, नंदूरबार, ३१), गणेश वळवी (मलापूर, नंदूरबार, ३०.०६).

खरीप बाजरी : (सर्वसाधारण गट) - ताराबाई दौलत बांदल (चव्हाणवाडी, पुणे, ६४.३८), लक्ष्मण रांधवण (रावणगाव, पणे, ५९.९६), योगेश गाडे (गुनाट, पुणे, ५८.३२) (आदिवासी गट) - तुळशीराम बहीरम (विजयनगर, नाशिक, २१.४९), बापू महाले (किकवरी खुर्द, नाशिक, २०.१६), उद्धव सोनवणे (नरकोळ, नाशिक, १९.६९).

भात : (सर्वसाधारण गट) - चंद्रकांत म्हातले (चंडिकानगर, रत्नागिरी, १२४.३७), गुरुनाथ सांबरे (पोई, ठाणे, १११.५५), विशाल पार्वते (सुळकुंड, कोल्हापूर, १११.२७) (आदिवासी गट) ः शेवंताबाई कडाळी (चरगाव, ठाणे, १०३.३८), वामन कडाळी (चरगाव, ठाणे, १०१.१८), किसन चिमटे (बोरवली, पुणे, ९९.०५).

नाचणी : (सर्वसाधारण गट) - शांताराम शिंदे (नांदवडे, कोल्हापूर, ७१.६९), विलास जाधव (जोर, सातारा, ७०.४०), श्रीकृष्ण रेंगडे (अडकुर, कोल्हापूर, ६९.४२) (आदिवासी गट) - जयराम काळे (आसे, पालघर, ३६.४५), पांडुरंग तुंगार (आसे, पालघर, २३.६८), यशवंत केवारी (विहीगाव, ठाणे, १९.२५).

खरीप मका : (सर्वसाधारण गट) - माणिक काटे (नवी लाटेवाडी, सोलापूर, १७५.८०), नवनाथ बंडगर (कटफळ, सोलापूर, १७२.६८), मैनाबाई कर्चे (पिंपरी, सोलापूर, १६०.९०) (आदिवासी गट) - अरुण वसावे (डोगेगाव, नंदूरबार, ६८.४०), वजीर सिंग गेन्या नाईक (अंजने, नंदूरबार, ६५.००), सुभाष वळवी (मोठे कडवान, नंदूरबार, ५१.८७).

खरीप मूग : (सर्वसाधारण गट) - विश्‍वनाथ पटणे (होटगी स्टेशन, सोलापूर, १७.५६) हरिभाऊ मस्के (उक्कडगाव, नगर, १५.००), दत्तात्रय राऊत (खुटबाव, सातारा, १३.७१), (आदिवासी गट) - पोपट गायकवाड (जयपूर, नाशिक, ८.२४), लक्ष्मण नाईक (ओमोदे, नंदूरबार, ६.३७).

खरीप उडीद : (सर्वसाधारण गट) - राजश्री मिनीनाथ गोरे (मिरजगाव, नगर, ३२.६३), महेश हक्के (मद्रे, सोलापूर, ३१.०८), सुरेश पुजारी (बोलकवठे, सोलापूर, २८.४३), (आदिवासी गट) - पोपट गायकवाड (जयपूर, नाशिक, ९.२५).

सोयाबीन : (सर्वसाधारण गट) - बाळासाहेब खोपकर (सावरवाडी, कोल्हापूर, ८५), प्रवीण यादव (भादोले, कोल्हापूर, ७७.४४), मैदाबी शेख (जाजनुर, लातूर, ७३.९२), (आदिवासी गट) - तानाजी चौरे (मुल्हेरे, नाशिक, ५२.०६), गणपत सूर्यवंशी (बोराटे दी., नाशिक, ४९.९८), शांताराम सातकर (गंगापूर ख., पुणे, ४०.७६).

तूर : (सर्वसाधारण गट) : संजय सोनबा पोटरे (पिंपळवाडी, नगर, ५४), राहुल राऊत (कुंभारगाव, सोलापूर, ४६.४७), नंदकिशोर पाटील (सताळा बुद्रुक, लातूर, ४५.१०) (आदिवासी गट) - जात्या गावीत (हळदानी, नंदूरबार, १९.१२), सुशिला मारुतीराव युवनाते (महेंद्री, अमरावती, १४.७५), आशिष महाले (वाई खु, अमरावती, १३.८०).

सूर्यफूल : (सर्वसाधारण) - दत्तात्रय वाघमोडे (सावे, सोलापूर, ३४.४०), बापू खंडागळे (संगेवाडी, सोलापूर, ९.७५).

भुईमूग : (सर्वसाधारण गट) - हिंमत पाटील (पेठ, सांगली, १०४.७०), महेश पाटील (तांदूळवाडी, सांगली, ७६.४९), रमेश चव्हाण (कालगाव, सातारा, ४७.८९).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT