Crop Competition : पीक स्पर्धांसाठी अर्ज स्वीकारणी सुरू

Kharif Season : राज्यातील खरीप हंगाम २०२४ मधील ११ पिकांच्या स्पर्धांसाठी प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
Crop Competition
Crop CompetitionAgrowon

Pune News : राज्यातील खरीप हंगाम २०२४ मधील ११ पिकांच्या स्पर्धांसाठी प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलैपर्यंत तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुलासाठी ३१ ऑगस्ट अर्ज भरता येतील.

प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे. स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असावी. ही जमीन तो स्वत: कसत असणे आवश्‍यक आहे. कोणत्याही शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

Crop Competition
Solapur Agriculture Department : कृषी विभागाची मोठी कारवाई, बोगस खते, बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द

स्पर्धक शेतकऱ्याकडे भात पिकासाठी किमान २० आर जमिनीत व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर म्हणजेच किमान एक एकर क्षेत्रात सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.

(ॲग्रो विशेष)

Crop Competition
Crop Competition : रब्बी पीक स्पर्धेतील सहभागासाठी ३१ पर्यंत अर्ज सादर करावेत

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरीय पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेत भाग घेत असलेल्या शेतकऱ्याला अर्ज (प्रपत्र-अ) सोबत, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा व आठ-अ उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र जोडावे लागेल. तसेच, पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा, बँक खात्याचे पासबुक किंवा चेकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रतदेखील जोडावी लागेल. स्पर्धेचा तपशील www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळू शकेल, असे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com