Banana Export Agrowon
ॲग्रो विशेष

India Export Bananas to Russia : रशियाने वाढवली भारताकडून केळी आयात?

India-Russia import policy : रशियाने इक्वेडोरला झटका देत भारताकडून केळी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : युक्रेन-रशिया युद्ध आणि हमास-इस्रायल युद्धामुळेचा अख्या जगावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक देशांच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंधही नवीन वळणावर पोहोचले आहेत. रशियाने युद्धाच्या दरम्यान भारताकडे व्यापारासाठी हात पुढे केले आहे. रशियाला भारत केळी निर्यात करत आहे. तर भारताने रशियाकडून खनिज तेलाची आयात वाढली आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम

युक्रेन-रशिया युद्धामुळे अमेरिका युक्रेनच्या जवळ गेला आहे. तसेच अमेरिकेकडून रशियावर निर्बंध लादून मित्र राष्ट्रांनी रशियापासून दूर राहावे असा सल्ला देण्यात आला होता. त्यावेळी पाश्चात्य देशांनी रशियन तेलाच्या आयातीत कपात केली होती. मात्र भारतासह मध्य आशियाई राष्ट्राकडून तेल खरेदी झपाट्याने वाढली होती. तर रशियाने २०२३ मध्ये भारताला विक्रमी तेल निर्यात केली होती.

दरम्यान रशियाची अन्न सुरक्षा देखरेख एजन्सी रोसेलखोझनादझोरने, भारतातून केळीची पहिली खेप जानेवारीत रशियात आली आहे. तर पुढील शिपमेंट फेब्रुवारीच्या अखेरीस रशियाला पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. तसेच रशियन फेडरल सर्व्हिस ऑफ व्हेटेरिनरी अँड फायटोसॅनिटरी पर्यवेक्षणाच्या हवाल्याने, रशियन बाजारपेठेत भारतीय केळीची आयात आणखी वाढणार असल्याचे म्हटले आहे.

तसेच रोसेलखोझनादझोरने देशाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आणि संचयन संचालनालयाच्या प्रतिनिधींशी भारताच्या फळ पुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केल्याचे कळत आहे. तसेच रशियन बाजारपेठेत फळांच्या पुरवठ्याचा विस्तार करण्यात भारताने स्वारस्य दाखलव्याचेही आपल्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय रशिया भारताकडून पपई, अननस, पेरू आणि आंबे या फळांचीही मोठी आयात करण्यास उत्सुक आहे.

जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश

युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) नुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश आहे. २०२३ मध्ये ३३ दशलक्ष टन केळीचे उत्पादन देशात अपेक्षित असून यानंतर चीन (१२ दशलक्ष टन), आणि इंडोनेशियाचा (८७ लाख टन) नंबर लागतो.

रशियाची खेळी

इक्वेडोर हा दक्षिण अमेरिका खंडातील देश असून केळी उत्पादक देश आहे. याच देशातून २० ते २५ टक्के केळी रशिया आयात करतो. त्याबदल्यात रशिया इक्वेडोरला आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवत होता. पण युक्रेन-रशिया युद्धामुळे युक्रेनच्या मदतीला अमेरिका गेली आहे.

तसेच इक्वेडोरला होणारा शस्त्रपुरवठा बंद करत आपणच शस्त्रपुरवठा करत आहे. यावरून रशियाने केळ्यांमध्ये कीड असल्याचे कारण पुढे करत इक्वेडोरहून होणाऱ्या आयातीवर रोख घातली आहे. तसेच रशियाने भारताशी केळीची आयात करताना लॅटिन अमेरिकन देशातून फळ खरेदी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियाची भारताला मदत

रशियाकडून भारताला अनेक क्षेत्रात आतापर्यंत मदत झाली आहे. यात पोलाद, खते, अणुऊर्जा आणि रशियन बनावटीची शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. तर भारतीय लष्करात ६० टक्क्यांहून अधिक शस्त्रास्त्रे रशियन बनावटीची आहेत. यात आता बदल होत असून भारत आता अमेरिकेकडून देखील शस्त्रास्त्रे घेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT