Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Issue : ग्रामीण मार्ग, शेतरस्त्यांना हवा निधी

Rural Road : ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाहनांचा वाढता भार लक्षात घेता दुरुस्ती, मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी निधीची गरज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात विविध भागांतील रस्त्यांसाठी शासनाने मोठा निधी देण्याची मागणी केली जात आहे. यात नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, धुळ्यातील साक्री आदी भागांत ग्रामीण मार्ग, शेतरस्त्यांसाठी निधीची मागणी होत आहे.

मध्यंतरी नंदुरबारमध्ये २४ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला होता. पण अन्य भागात निधी समान किंवा हवा तसा आला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाहनांचा वाढता भार लक्षात घेता दुरुस्ती, मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी निधीची गरज आहे.

आदिवासी पट्ट्यातील शेतरस्ते, ग्रामीण रस्त्यांची दैन्यावस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी सतत केली आहे. पण सर्वत्र निधी दिला जात नाही.

सततची मागणी व गरज लक्षात घेता नंदुरबारमध्ये २४ कोटी २० लाख रुपये निधी शासनाने मंजूर केला. त्यात बिगरआदिवासी क्षेत्रातील गावांसाठी १९ कोटी ६० लाख, तर आदिवासी क्षेत्रातील गावांसाठी चार कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

नंदुरबारमधील कोपर्ली ते कंढ्रे रस्त्यासाठी ६० लाख, बह्याने ते आराळे रत्यासाठी ४० लाख, कोपर्ली ते शेल्टी रस्त्यासाठी एक कोटी, कार्ली ते कांड्रे रस्त्यासाठी लाख ४० लाख, जुनमोहिदा ते तिसी स्टेशन ८० लाख, न्याहली, बलदाणे, भादवड-सतुरखे रस्ता एक कोटी, इजिमा ५४ ते मालपूर रस्ता ७५ लाख, तलवाडे ते नंदुरबार तालुका हद्दीस मिळणारा रस्ता ७५ लाख,

होळ ते तिसी स्टेशन रस्ता ७५ लाख, आसाणे ते ठेलारपाडा रस्ता ५० लाख, नंदुरबार तालुक्यातील प्रजिमा-१७ ते सैताने रस्ता २५ लाख, घोताणे ते आसाने रस्ता ३० लाख, तलवाडे बुद्रुक ते प्रजिमा-५४ ला मिळणारा रस्ता ५० लाख, रनाळे ते रजाळे रस्ता ५० लाख, रनाळे ते धंडाणे एक कोटी रस्ता, रनाळे ते धंडाणे रस्त्यावर चार स्लेबड्रेन बांधणे ९० लाख, यासह अन्य रस्त्यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज

Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

US Election 2025: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल काय सांगतात?

Cotton Farmer Issue: कापूस उत्पादकांची चहूबाजूंनी कोंडी

Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू

SCROLL FOR NEXT