
Latur News : शेतरस्ते व पाऊलवाटा या शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिन्या आहेत. मात्र, त्यावरील अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते. साई-महापूर-बोरगाव या पाऊलवाटेवरही ४० ते ५० वर्षांपासून अतिक्रमण होते.
महसूल विभागाच्या पुढाकाराने हे अतिक्रमण दूर केल्यानंतर शुक्रवारी (ता. २४) त्यावर जेसीबीच्या साह्याने कच्चा रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते कच्चा रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली.
साई-महापूर-बोरगाव या पाऊलवाटेवर शेजारच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. पाऊलवाट नेस्तनाबूत झाली होती. मात्र, गाव नकाशावर पाऊलवाटेची नोंद होती. त्यावरून शेतकऱ्यांनी पाऊलवाटेवरील अतिक्रमण दूर करून देण्याची मागणी केली.
उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी पाऊलवाटेवरील अतिक्रमण दूर करण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल, भूमिअभिलेख व पोलिस विभागाने एकत्र येत पाऊलवाट अतिक्रमणमुक्त केली.
रस्ता मोकळा झाल्यानंतर शेजारच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यावर जेसीबीच्या साह्याने साडेआठ फूट रूंदीचा कच्चा रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले. तहसीलदार तांदळे यांच्या हस्ते कामाला सुरुवात होताच वेगाने रस्त्याचे काम तडीस नेण्यात आले. या रस्त्यामुळे पन्नासहून अधिक शेतकऱ्यांची सोय झाली आहे.
या वेळी मंडळ अधिकारी महेश हिप्परगे, ग्राम महसूल अधिकारी वैशाली सूर्यवंशी, परीरक्षण भूमापक डी. जी. तेलंगे, पोलिस कर्मचारी वायकर, शेतकरी विठ्ठल पवार, हनुमंत पवार, विलास पवार, शिवाजी पवार, कृष्णा पवार, नितीन पवार, राहुल पवार, बळीराम पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.