Nandurbar News  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिक्षकांच्या पाठीशी

Rural Education : ग्रामीण आणि दुर्गम भागातील शैक्षणिक हेळसांड थांबावी, या हेतूनेच अनेक जिल्हा परिषद शाळांची इमारत बांधणी हाती घेतली.

Team Agrowon

Nandurbar News : ग्रामीण आणि दुर्गम भागातील शैक्षणिक हेळसांड थांबावी, या हेतूनेच अनेक जिल्हा परिषद शाळांची इमारत बांधणी हाती घेतली. जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यास जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कायम प्राधान्य दिले.

ग्रामीण भागाचा शैक्षणिक कायापालट घडविण्यासाठी आम्ही सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी गुरुवारी (ता. ५) येथे सांगितले. जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण झाला.

त्या वेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. कुमुदिनी गावित, वित्त व शिक्षण समितीचे सभापती गणेश पराडके, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हेमलता शितोळे, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावित, शिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण आदी उपस्थित होते. यांचा झाला गौरव

नंदुरबार तालुका : मनोजकुमार पोपट चौधरी (सेजवे), नवापूर : सरिता वळवी (सोनारेदिगर), शहादा तालुका : लक्ष्मी रूपदे (शिरूड दिगर), तळोदा तालुका : दिलीप पाटील (तऱ्हावद पुनर्वसन शाळा क्र.७), अक्कलकुवा : आशाबेन पटेल (ब्राम्हणगाव), धडगाव : रवींद्र शिंदे (तोरणमाळ). विशेष उत्तेजनार्थ : चेतन शिंदे (कलमाडी, बोरद, ता.शहादा) व अविनाश गावित (कात्री, ता. धडगाव). मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियान स्पर्धेचा निकाल या वेळी घोषित करण्यात आला. त्यात जिल्हा परिषदेच्या तीन व खासगी व्यवस्थापनातील तीन शाळांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT