Aashadhi Wari 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Aashadhi Wari 2025: ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याकडून पालखी तळाची पाहणी

Jaykumar Gore: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी वारकरी व भाविकांसाठी पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता यासह अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी मार्ग, तळ आणि पंढरपूर परिसराची पाहणी केली.

गणेश कोरे

Purandar News: संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पालखी सोहळ्यादरम्यान येणाऱ्या वारकरी व भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुशंगाने ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. पालखीतळाच्या इतर कामांबाबत समाधान व्यक्त करताना पालखीतळाशेजारी रेल्वेने केलेल्या भुयारी मार्गाच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत मात्र त्यांनी साशंकता व्यक्त केली.

२५ जून रोजी संत ज्ञानेश्नवर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथे मुक्कामी विसावत आहे. त्या पालखी सोहळ्यातील वैष्णवांची गैरसोय होऊ नये भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने मंत्री गोरे यांनी शनिवारी (ता. ७) वाल्हे येथील पालखीतळाला भेट देऊन परिसराची पहाणी करून अनुषंगिक मार्गदर्शक सूचना दिल्या.

याप्रसंगी प्रभारी विभागीय आयुक्त कविता दिवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपुत, गटविकास अधिकारी प्रणोती एस. श्रीमाळ, सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच सम्राज्ञी लंबाते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी येथील चौदा एकरमधील पालखी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबतची माहिती दिली. दरम्यान मंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

माजी सरपंच अमोल खवले यांनी रेल्वे भुयारी मार्गाच्या दुतर्फा संरक्षण भिंत उभारण्याबाबत तर जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामकाजासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ यांनी मंत्री गोरे यांच्याकडे निवदने सादर केली. दरम्यान या वेळी वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT