Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Junnar Leopard Attack : बिबट्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा

Junnar Forest Department : बिबट्या हल्ल्याप्रश्‍नी जुन्नरमध्ये मोर्चा. शेतकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत आले असताना देखील वन विभागाला त्याची जाण नाही.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यातील बिबट्या मानव संघर्षात गेल्या १५ दिवसांत ५ जणांना जीव गमावाला लागला आहे. बिबट्या रूपी मरण शेतकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत आले असताना देखील वन विभागाला त्याची जाण नाही. वन विभागाचे अधिकारी वातानुकूलीत दालनात बसून बिबट्या प्रश्‍न हाताळतात.

त्यांना शेतकऱ्यांच्या जिवाचे काही देणे घेणे नाही, अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तर सर्व बिबट्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवून हे बिबटे ताडोबा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धासह गुजरात येथे पाठवावेत, अशी मागणी माजी आमदार आणि शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी केली.

बिबट्यांच्या हल्ल्याप्रश्‍नी गेले चार दिवसांपासून सोनवणे यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. उपोषणदरम्यान त्यांनी सोमवारी (ता. २७) जुन्नर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, धनगर कुटुंब मेंढ्यासह सहभागी झाले होते.

या वेळी सोनवणे म्हणाले, ‘बिबट्यांचा प्रश्‍न गंभीर होत असताना, वन विभागाचे अधिकारी आचारसंहितेची भीती दाखवून कोणत्याही उपाययोजना करत नाहीत. दररोज एक हल्ला होत असून शेतकऱ्यांचा जीव जात आहे.

शेतकरी (Farmer) आणि धनगरांना जगणे मुश्‍कील झाले असून, बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात यावी, शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT