Wild Animal Rampage : उपद्रवी वानर, माकडे पकडण्यासाठी पिंजरा

Animal Crop Damage : उपद्रवी वानर, माकडांना पकडण्यासाठी वनविभागामार्फत पिंजऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
Monkey Cage
Monkey CageAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : जिल्ह्यातील शेती-बागायतीसाठी उपद्रव ठरत असलेली वानरे, माकडे यांना पकडून अभयारण्यात सोडण्याकरिता आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदान मिळाले आहे. उपद्रवी वानर, माकडांना पकडण्यासाठी वनविभागामार्फत पिंजऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये एका दिवसात ४० ते ५० वानर किंवा माकडे पकडण्याची क्षमता आहे. त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याचे एक पथक ३ ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये जालना येथून जाऊन, वानर माकड पकडण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आले आहेत. त्यामध्ये परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनपाल सताप्पा सावंत, वनरक्षक अरविंद मांडवकर यांचा समावेश होता.

Monkey Cage
Wild Animal Attack : वन्यजीवांच्या हल्ल्यात यंदा ६० जण ठार

जिल्ह्यातील उपद्रवी वानर-माकडे पकडण्यासाठी आवश्यक असलेला पिंजरा तयार करण्याचे काम वनपाल सुरेश उपरे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांनी सर्व सोयींयुक्त, वापरण्यास, हाताळण्यास व वाहतुकीस योग्य अशा पिंजऱ्याची निर्मिती केली आहे. या पिंजऱ्याचे प्रात्यक्षिक केळशी (ता. दापोली) येथे घेण्यात आले होते.

उपद्रवी वानर, माकडे पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पिंजरा हा चार पिंजऱ्याचे एक युनिट या पद्धतीचा आहे. यामध्ये दोन पिंजरे जमिनीवर ठेवले जातात व एक पिंजरा पीकअपमध्ये ठेवला जातो. एक रॅम्प पिंजरा पीकअपमधील पिंजऱ्यामध्ये वानर, माकड यांना घेण्यासाठी तयार केलेला आहे.

जमिनीवरील पहिल्या पिंजऱ्यात वानर, माकडांसाठी खाद्य ठेवले जाते. त्याचा दरवाजा रस्सीच्या साह्याने उघड-बंद केला जातो. खाद्याच्या अमिषाने वानर पहिल्या पिंजऱ्यात आल्यानंतर पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला जातो. या प्रकारे बंदिस्त झालेले वानर पिंजरा क्रमांक २ मध्ये घेतले जाते आणि पिंजरा क्र. एकचा दरवाजा पुन्हा उघडला जातो.

Monkey Cage
Wild Animal Crop Damage : वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान

पिंजरा नंबर २ मध्ये बंदिस्त वानर रॅम्प पिंजऱ्याच्या साह्याने पीकअपमधील पिंजऱ्यामध्ये घेतले जाते. या प्रकारे एक-एक वानर माकड बंदिस्त केले जाते. जमिनीवरील दोन्ही पिंजरे फोल्डिंग पद्धतीने तयार केलेले असून पीकअपमधील पिंजरा फिक्स असून तो दोन भागांचा आहे.

वानर, माकडांच्या वेगवेगळ्या टोळ्या बंदिस्त ठेवण्यासाठी ही रचना करण्यात आली आहे. एका दिवशी साधारणतः ४० ते ५० माकड पकडण्याची क्षमता या पिंजऱ्याची आहे. हे सर्व पिंजरे एका गाडीमध्ये वाहतूक करता येतील असे आहेत.

ग्रामस्थांची मदत लागणार

वानर, माकड पकडण्यासाठी ३ ते ४ कर्मचारी आवश्यक आहेत. गावात पिंजरा ठेवलेल्या ठिकाणी खाद्याच्या अमिषाने वानरांना आणण्यासाठी ग्रामस्थांची मदत लागणार आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याची खूपच आवश्यकता आहे. ग्रामस्थांनी वनविभागाला सर्वतोपरी सहकार्य केल्यास उपद्रवी वानरांना बंदिस्त करून अभयारण्यात स्थलांतरित करण्याची योजना नक्कीच यशस्वी होईल, असे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com