Cashew Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Rate : काजू दराचा वाद संपुष्टात, शासनाकडून काजूला १० रुपये अनुदान, बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून काजू दरावरून जोरदार वाद सुरू होता. दरम्यान यावर काल महत्वपूर्ण बैठक पार पडली.

sandeep Shirguppe

Cashew Rate Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून काजू दरावरून जोरदार वाद सुरू होता. दरम्यान यावर काल महत्वपूर्ण बैठक पार पडली. काजू दरावरून निर्माण झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. काजूला शासन दहा रुपये अनुदानासह १३० रुपये दर येणार आहे.

याबाबतचा तसा निर्णय आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत शेतकरी व कारखानदार यांच्या बैठकीत झाला. यावर्षीसाठी या दराशी समाधानी असल्याचे सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले.

शासनाचे दहा रुपये अनुदान आचारसंहितेनंतर देण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील काजू बीला स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर १९७ रुपये दर मिळावा, या मागणीवर सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार ठाम होते; मात्र याबाबत काहीच तडजोड होत नसल्याने शेतकरी नाराज होते. त्यांनी आक्रमक भूमिका हाती घेतली होती. हा तिढा सोडवण्यासाठी केसरकर यांनी पुढाकार घेतला.

शासनाकडूनही काजू बीला दहा रुपये दरामागे अनुदान देण्याचे जाहीर केले; मात्र, ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे संघामध्ये नाराजी कायम होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी व फळबागायतदार संघ व कारखानदार यांची बैठक केसरकर यांनी बोलावली.

यात काजू बागायतदारांची नाराजी दूर करत त्यांना शासनाचे अनुदान पकडून १३० रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले. या संदर्भात केसरकर म्हणाले, "जिल्ह्यातील कारखानदारांकडून शेतकऱ्यांची काजू बी खरेदी करताना बाजारपेठेत ११० रुपये दर असलेला काजू ११५ रुपये तर ११५ रुपये दर असलेला काजू १२० रुपये दराने विकत घेण्याचे मान्य केले. या दरामागे शासनाकडून मिळण्यात येणारे दहा रुपयाचे अनुदानही देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT