Agriculture Land Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Land : जमीन नकाशासाठी हेलपाटे बंद होणार

Bhumi Abhilekh : जमिनीची मोजणी आणि नकाशा मिळवण्याची कामे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहेत. मात्र, शेतकऱ्यांना त्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे बंद व्हावेत, याकरिता अक्षांश-रेखांश आधारित नकाशे वाटण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

मनोज कापडे

Pune News : जमिनीची मोजणी आणि नकाशा मिळवण्याची कामे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहेत. मात्र, शेतकऱ्यांना त्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे बंद व्हावेत, याकरिता अक्षांश-रेखांश आधारित नकाशे वाटण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

भूमि अभिलेख संचालनालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार आता राज्यातील १०६ तालुक्यांमध्ये अक्षांश-रेखांश आधारित जमीन मोजणीची कामे केली जात आहेत. या भागातील शेतकरी व नागरिकांना अक्षांश-रेखांश आधारित नकाशे वाटले जात आहेत.

त्यामुळे यापुढे नकाशा हरविला तरी शासन दफ्तरी एक इंचही जमीन मागे पुढे होणार नाही. शेतकरी आपआपल्या भ्रमणध्वनीद्वारे नकाशे मिळवू शकणार आहेत. अक्षांश-रेखांश नमुद केल्यामुळे आता जमीन मोजणीच्या आधी किंवा मोजणीनंतर शेतकरी पुनःपुन्हा घर बसल्या जमिनीचे नकाशे प्राप्त करू शकतील.

जमीन मोजणीनंतर प्रत्येकाच्या जमिनीची हद्द ठरते. विशेष म्हणजे पोटहिस्से झाल्यानंतर पुन्हा मोजणी करुन आपआपसात जमिनीची हद्द ठरवून घेतो. या कामात अनेकदा त्रुटी होतात. ग्रामस्थ, शेतकऱ्यांकडून भूमि अभिलेख खात्याकडे चुकीची जमीन मोजणी व हद्दीच्या वादाबाबत सातत्याने तक्रारी येतात.

मोजणीसाठी आधी राज्यभर जुनाट ईटीएस (इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन्स मशीन्स) उपकरण वापरले जात होती. त्याच्या मदतीने एका दिवसात एक कर्मचारी केवळ एक ठिकाणी मोजणी करीत असे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भूमि अभिलेख संचालक नि.कु.सुधांशू यांनी जमीन मोजणीच्या कामकाजात कमालीचे बदल घडवून आणले आहेत. त्यांनी ‘कॉर्स’ (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) प्रणालीच्या मदतीने मोजणीची कामे राज्यात सुरू केली.

कॉर्समुळे ‘जीपीएस’ नोंदी जलद घेता येतात. कॉर्सला ‘रोव्हर’(उपग्रह प्रणालीशी जोडलेले भूमापन उपकरण) जोडले गेल्यामुळे मोजणी त्वरित व बिनचूक होऊ लागली. रोव्हरची उपयुक्तता ध्यान्यात आल्यामुळे श्री. सुधांशू यांनी राज्यभर विदेशी बनावटीचे रोव्हर उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

‘‘रोव्हर थेट उपग्रहाशी जोडलेला असल्यामुळे क्षणात अक्षांश रेखांशसह (कॉर्डिनेटस्) मोजणी होते. गेल्या एक वर्षांपासून रोव्हर व कॉर्सच्या मदतीने यशस्वीपणे जमीन मोजणी होत असल्याचे भूमि अभिलेख संचालनालयाने सिद्ध केले. त्यानंतर आता १०६ तालुक्यांमध्ये या प्रणालीच्या आधारावर जमीन मोजणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांना अक्षांश-रेखांश आधारित जमीन मोजणी नकाशे मिळतील,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

असे होत आहेत बदल

- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाऐवजी कॉर्स व रोव्हर प्रणालीतून जमीन मोजणी.

- मोजणीअंती नकाशाची क प्रत पुरवली जाते. त्यावर आता अक्षांश व रेखांश आकडे दिले जातील.

- अक्षांश व रेखांश दिल्यामुळे हद्द चोरणे, हद्दीत अंतर पडणे असे वाद कायमचे बंद होतील.

- अक्षांश व रेखांशासहित सामान्य नागरिकांना थेट संकेतस्थळावर नकाशे मिळतील.

- सध्या विशिष्ट तालुक्यांचे अक्षांश व रेखांशासह संकेतस्थळावर नकाशे मोफत उपलब्ध.

- शेतकऱ्यांना https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सर्वसमावेशक सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न.

एकदा जमिनीची मोजणी होताच नकाशासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. आम्ही १०६ तालुक्यांमध्ये अक्षांश-रेखांश आधारित नकाशांची कामे सुरू केली आहेत. यात पुढील तीन महिन्यांत अजून १२५ तालुके समाविष्ट होतील. या वर्षाअखेरीस पूर्ण राज्यात ही योजना लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- नि. कु. सुधांशू , संचालक, भूमि अभिलेख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT