Land Record : जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च २.१’ प्रणाली सुरू

Land Document : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च’ संगणक प्रणाली विकसित केली आहे.
Land Record
Land Record Agrowon

Pune News : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. यात नोंदणी विभागाने सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई-सर्च २.१’ ही प्रणाली आणली आहे. त्यामुळे ई-सर्चमध्ये दस्त शोधणे आता अधिक गतिमान झाले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यात अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून खरेदी- विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक्र विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

Land Record
Land Record Entry : जमीन रेकॉर्डमधील चुकीची दुरुस्ती

एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यामध्ये आर्थिक फसवणूक होते. एक सदनिका अनेक बँकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात. या पार्श्वभूमीवर जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च’ प्रणाली उपयुक्त ठरते.

Land Record
Land Records Office : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोजणी प्रलंबित

मागील आठ वर्षांत ‘ई-सर्च’ प्रणालीमध्ये बदल करण्यात आले नव्हते. तसेच ई-सर्चमध्ये दस्त शोधण्यास वेळ लागतो, लवकर डाऊनलोड होत नाही. अशा तक्रारी वारंवार आल्यानंतर नोंदणी विभागाने ई-सर्च प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.

‘ई-सर्च २.१’ मध्ये हे दस्त उपलब्ध

सद्यःस्थितीत ‘ई-सर्च २.१’ मध्ये १९८५ ते २००२ पर्यंत आणि २०१२ ते २०२३ पर्यंतचे दस्त उपलब्ध आहे. सध्या २००२ ते २०१२ या दरम्यानचे दस्त उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून दोन महिन्यांत हे दस्त ‘ई-सर्च २.१’ मध्ये उपलब्ध होतील.

असा शोधा दस्त

विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘रेकॉर्ड आणि पेमेंट्स’ या सदराखाली ‘ई-सर्च’ पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये सुरुवातीस वर्ष, जिल्हा, तालुका, गाव, दस्ताचा प्रकार आणि सर्व्हे नंबर, सिटी सर्व्हे नंबर अथवा दस्त नंबर ही माहिती भरल्यानंतर ‘ई-सर्च’ मध्ये मिळकतीबाबत नोंदविण्यात आलेल्या व्यवहारांची यादी मिळणार आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाने ई-सर्च या प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई-सर्च २.१’ ही प्रणाली आणली आहे. यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक गतीने जुने दस्त शोधता येणार आहे. नागरिकांच्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया feedback@ igrmaharashtra.gov.in या ई-मेलवर कळवाव्यात.
-अभिषेक देशमुख, उपमहानिरिक्षक नोंदणी व मुद्रांक विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com