Rohit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Rohit Pawar : ईडीकडून बारामती अॅग्रोची कागदपत्रे जप्त; रोहित पवार यांचा स्पष्ट नकार

Baramati Agro : बारमती अ‍ॅग्रो मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने केलेल्या छापेमारीनंतर रोहित पवार यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार नातू रोहित पवार यांच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. त्यांच्या बारमती अ‍ॅग्रोवर कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शनिवारी (ता. ५ रोजी) छापेमारी केली होती. त्यानंतर बारामती अ‍ॅग्रोचे काही महत्वाचे कागदपत्रे ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून रोहित पवार यांनी रविवारी (ता. ६ रोजी) आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

रोहित पवार यांनी, 'यावरून काही लोकांनी राजकारण करायचं आहे. आम्हाला यावर राजकारण कारायचं नाही. मात्र फडणवीस ज्या शहरात असतात त्या शहरात दिवसाढवळ्या खून होतात. तर देशात सगळ्यात खराब पोलिस व्यवस्था ही महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाची राजीनामा देऊन आणि फक्त गृहमंत्री पद आपल्याकडे ठेवावे', असे म्हटले आहे.

सक्तवसुली संचलनालयाने शनिवारी बारामती ॲग्रोच्या बारामतीतील कार्यालयावर छापा टाकला होता. तसेच कथित गैरव्यवहार प्रकरणी पुण्यासह इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती.

पुढे रोहित पवार म्हणाले, 'त्यांनी दोन्ही पदे आपल्याकडेच ठेवल्यामुळे त्यांच्यावर ताण येत आहे. त्यामुळे एक पद आपल्याकडे ठेवावे. ज्यामुळे किमान गरीबाला न्याय मिळेल'. तसेच, 'त्यांना गृहमंत्री पदावरून जनतेला न्याय देता येत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदही ही सोडावे. फडणवीस यांनी त्यांच्या कामावर बोलावे दुसऱ्यावर बोलू नये', असा टोला लगावला आहे. "त्यांनी दोन्ही पदे आपल्याकडेच ठेवल्यामुळे त्यांच्यावर ताण येत आहे. त्यामुळे एक पद आपल्याकडे ठेवावे. ज्यामुळे किमान गरीबाला न्याय मिळेल," अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली.

भाजपचे सरकार येताच आमच्यावर सीआयडी, इनकम टॅक्स विभागाची कारवाई झालेली आहे. त्यामुळे माझा विषय कितीही मोठा करून दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण भाजपने याच्याआधी ज्यांच्यावर आरोप केलेत, जे आता भाजपबरोबर आहेत त्यांच्याबाबत काय कारवाई केली याचे आधी उत्तर द्यावे. तसेच विरोधकांवर कारवाई का केली जात आहे हे सर्वसामान्यांना माहित असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

माहिती लीक होते कशी?

ईडीचे अधिकारी येतात, तापस करतात, कागदपत्र जप्त करतात. हे होत असतं. पण ही माहिती माध्यमातून मिळते. मात्र ईडीने कागदपत्र जप्त केलेली नाहीत. त्यांना लागणारी कागदपत्रे याच्याआधीच त्यांना देलेली आहेत. पण जी माहिती फक्त तपास यंत्रणा आणि आम्हाला माहित असते ती माध्यमांपर्यंत जातेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT