Rohit Pawar : रोहित पवार यांच्यावर संकंटाचे मळभ; ईडीचा बारामती अॅग्रोवर छापा

Baramati Agro : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर शुक्रवारी (ता. ५ रोजी) ईडीचा छापा पडला आहे. ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
Rohit Pawar
Rohit PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांवर एक एक संकटे येत आहेत.राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर शुक्रवारी (ता. ५ रोजी) ईडीचा छापा टाकला आहे. ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार हे एकाकी झूंज देत होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह शिंदे आणि भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. दरम्यान आज त्यांच्या बारामती येथील बारामती ॲग्रोच्या कार्यालयावर केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने धाड टाकली आहे.

Rohit Pawar
Baramati Agro : रोहित पवार यांच्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ईडीच्या एका पथकाने कंपनीवर छापा टाकला. ज्यात पाच ते सहा अधिकारी असल्याचे समोर येत आहे. तर त्यांच्याकडून येथे चौकशी केली जात असल्याचे समोर आले आहे.

ईडीचे राज्यात सहा ठिकाणी छापे?

मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ज्यात मुंबईसह इतर सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान ईडीच्या एका पथकाडून रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कार्यालयावर धाड टाकली आहे.

Rohit Pawar
Talathi Bharati 2023 : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदतवाढ, रोहित पवार यांनी केली होती मागणी

कारवाईची जंत्रीच

याआधी प्रदुषण महामंडळ आणि साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोवर कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. तिथे त्यांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रनेकडून छापा टाकण्यात आला आहे.

अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांच्यात वाद

आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका पथकाने येथे धाड टाकली. यावेळी यात पाच ते सहा अधिकारी होते. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या पथकातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांच्यात वाद झाल्याचेही कळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com