Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : ईसरवाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन

Farmer Issues : खरीप २०२४ पीकविमा अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफी, कर्ज वसुली स्थगिती, पुनर्गठन तसेच उसाचा भाव जाहीर न करताच सुरू असलेली ऊसतोड साखर कारखान्याकडून तत्काळ भाव जाहीर करावा

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : खरीप २०२४ पीकविमा अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफी, कर्ज वसुली स्थगिती, पुनर्गठन तसेच उसाचा भाव जाहीर न करताच सुरू असलेली ऊसतोड साखर कारखान्याकडून तत्काळ भाव जाहीर करावा

या मागण्यासाठी अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ईसरवाडी फाटा (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी (ता.20) सकाळी दहा वाजता शेतकरी कृती समितीच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल ढोले, महेश गुजर, अण्णासाहेब जाधव, योगेश शेळके, शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, सरपंच धनंजय ढोले, जनार्धन निकम, चेअरमन बाबासाहेब सुकासे, विठ्ठल कुंजर, संतोष खवले, जगन्नाथ ढोले, लक्ष्मण ढोले, वसंत गावंडे, रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने परिसरातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या ठिकाणी शेंदुरवादा, सावखेडा, मांगेगाव, गुरू धानोरा, दहेगाव, लिंबे जळगाव, सह गंगापूर तालुक्यातील विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. यावेळी तब्बल अर्धा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रस्ता रोको मध्ये सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकरी कृती समितीच्या समन्वयकांनी आपल्या मागणीची निवेदन महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अभय साब्दे, तलाठी प्रकाश गायकवाड सहाय्यक निबंध के. एम. चौधरी उप पोलिस निरीक्षक रमेश राठोड यांना देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT