Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Water Shortage : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीनाले कोरडेच

Monsoon update : मॉन्सूनच्या आगमनानंतर ८ दिवस उलटून गेले असले तरी जिल्ह्यातील बहुतांशी नदीनाले अजूनही कोरडेच आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात भात रोपवाटिका रखडल्या आहेत. सोमवारी (ता.१९) जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

Team Agrowon

Sindhudurg News : मॉन्सूनच्या आगमनानंतर ८ दिवस उलटून गेले असले तरी जिल्ह्यातील बहुतांशी नदीनाले अजूनही कोरडेच आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात भात रोपवाटिका रखडल्या आहेत. सोमवारी (ता.१९) जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

जिल्ह्यात १२ जूनला मॉन्सूनचे आगमन झाले. त्यानंतर दमदार पावसाची अपेक्षा होती. परंतु जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. एक-दोन दिवस पावसाच्या दमदार पडल्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली.

जिल्ह्यात २० ते २५ टक्के भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. पावसाअभावी या रोपवाटिका देखील संकटात सापडल्या होत्या. परंतु दोन दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यात पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या. त्यामुळे रोपवाटिकेवरील संकट टळले. मात्र त्यानंतर दोन दिवस अजिबात पाऊस पडला नाही.

मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर आठ ते दहा दिवस होत आले आहेत तरीदेखील जिल्ह्यातील बहुतांशी नदीनाले कोरडेच असल्याचे चित्र आहे. अपेक्षित पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करण्याची कामे थांबविली आहेत.

जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर खरिपात भातपीक उत्पादन घेतले जाते. पाऊस लांबल्याने यावर्षीच्या खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पावसाअभावी पुनर्लागवड रखडली

जिल्ह्यात १० ते१५ टक्के शेतकरी २० मेच्या सुमारास भात रोपवाटिका तयार करतात. मॉन्सूनचे आगमन ८ ते १० जूनला ग्रहित धरून या रोपवाटिका तयार केल्या जातात. २० मेच्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या रोपवटिकेतील रोपांना आता ३० दिवस झाले आहेत.

पावसाअभावी या रोपांची पुर्नलागवड रखडली आहे. ही रोपे जरी आता लागवड केली तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT