Kolhapur Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : कोल्हापुरात नद्यांचे पाणी पात्राबाहेर

Kolhapur Rain News : गेल्‍या तीन दिवसांपासून होणाऱ्या सातत्यपूर्ण पावसामुळे कृष्णा वगळता बहुतांशी नद्या पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : गेल्‍या तीन दिवसांपासून होणाऱ्या सातत्यपूर्ण पावसामुळे कृष्णा वगळता बहुतांशी नद्या पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले आहे. पश्‍चिम भागात पावसाची उघडझाप असली तरी नद्यांच्या पाण्यात वाढ होत असल्‍याचे चित्र आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ४, ५ व ६ खुले असून, सध्या धरणातून ५ हजार ७८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- नीळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगाव, कासारी नदीवरील यवलूज, कांटे, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण व वालोली,

भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकुड व सिद्धनेर्ली, तुळशी नदीवरील- बीड, वारणा नदीवरील खोची, कोडोली, शिगाव, चावरे, तांदूळवाडी, चिंचोली व माणगाव, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी व ऐनापूर, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व चंदगड असे ४२ बंधारे पाण्याखाली आहेत.

बंधाऱ्यांची पाणीपातळी अशी (मंगळवारी बारापर्यंत, फुटांमध्ये)

राजाराम ३३.९, सुर्वे ३२.१, रुई ६१.६, इचलकरंजी ५८, तेरवाड ५१, शिरोळ ४६, नृसिंहवाडी ४५, राजापूर ३५.५, सांगली २२.९, अंकली २६.१०

मंगळवारी सकाळी आठ वाचेपर्यंतच्या चोवीस तासांतील पाऊस असा (मिलिमीटर)

हातकणंगले १८, शिरोळ ८.२, पन्हाळा ४०.६ , शाहूवाडी ३९.४, राधानगरी ३५.१, गगनबावडा ७०.८, करवीर २६.७, कागल १९, गडहिंग्लज २५.८, भुदरगड ४२.३, आजरा ६८.९, चंदगड ४०.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kidney Sale Case: एकोणीस शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या

Agri Crop Damage: लातूर जिल्ह्यात चौदा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Papaya Price: खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत

Land Acquisition Dispute: दमदाटी करून जमिनी का घेता?

Maharashtra Rain Forecast: यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT