Flood Control Project Kolhapur : पूरनियंत्रण प्रकल्प कामास तत्काळ सुरुवात करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

Kolhapur Sangli Flood : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील महापुराच्या उपाययोजनांची चर्चा केली.
Flood Control Project Kolhapur
Flood Control Project Kolhapuragrowo
Published on
Updated on

Kolhapur Sangli Flood Control : ‘सांगली, कोल्हापूरमधील पूर नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून, त्यासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. या कामास तातडीने सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त होईपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळकडे उपलब्ध असणाऱ्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्यास मान्यता द्यावी. बँकेचा निधी प्राप्त होता ही रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाला रेट्रो ॲक्टिव्ह फायनान्सिंगद्वारे परत करता येईल. त्यामुळे पूर नियंत्रणाचा एमआरडीपी प्रोजेक्ट तातडीने सुरू करणे शक्य होईल,’ अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली.

‘मित्रा’ संस्थेची बैठक मुंबई येथे पार पडली. यामध्ये संस्थेचे उपाध्‍यक्ष आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील महापुराच्या उपाययोजनांची चर्चा केली. जागतिक बँकेचा निधी उपलब्ध होईपर्यंत कृष्णा खोरे महामंडळाकडून निधी घ्यावा आणि नंतर तो परत करावा, असा प्रस्ताव मांडला. याला मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये महापूर उपाययोजनांच्या कामाला तत्काळ सुरुवात करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अपर मुख्य सचिव इकबाल चहल, विकास खारगे, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी हे उपस्थित होते.

Flood Control Project Kolhapur
Kolhapur Flood : महापुराने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला; ३३ टक्के पिकाचे नुकसान, आता मदतीची प्रतिक्षा?

कन्व्हेन्शन सेंटर काम सुरू करा

कोल्हापूर शहरात कन्व्हेन्शन सेंटर (परिषद केंद्र) निर्मिती होण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली असून, यास मंजुरीही देण्यात आली आहे. परंतु, प्रस्तावित आराखड्यानुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसून, कन्व्हेन्शन सेंटरच्या कामास तातडीने सुरुवात व्हावी, अशी मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कन्व्हेन्शन सेंटर स्थापनेची प्रक्रिया अंतिम करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

आय.टी.पार्कसाठी जमीन वाटप प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश

कोल्हापुरातून अनेक युवक-युवती पुणे, बंगळूर अशा शहरातील आयटी कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. या क्षेत्राचा विकास व्हावा याकरिता कोल्हापूर आयटी असोसिएशन कार्यरत आहे. गेल्या १५ वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील आयटी प्रकल्पासाठी जागेची मागणी होत असून, आयटी प्रकल्पासाठी शेंडा पार्क येथील जमीन तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती क्षीरसागर यांनी केली. त्याला मुख्मंत्र्यांनी मान्यता देत जमीन वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com