Radhakrishna Vikhe Patil agrowon
ॲग्रो विशेष

River Linking Project : नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल : राधाकृष्ण विखे -पाटील

Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी व्यक्त केला.

sandeep Shirguppe

Maharashtra Drought : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या नदीजोड प्रकल्पाला राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठी तरतूद करून बुस्टर दिला आहे. गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी राज्य सरकारकडून मोठी आर्थिक तरतुदी केली, यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी व्यक्त केला. शिर्डी येथे मंगळवार (ता.११) मंत्री विखे -पाटील माध्यमांशी बोलत होते.

राधाकृष्ण विखे -पाटील म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांकरिता पाठबळ देणारा आहे. राज्यातील सिंचन प्रकल्पाकरिता सिंचन सुधारणा कार्यक्रमासाठी नाबार्डच्या सहकार्याने ५०० कोटी रुपयांची केलेली तरतूद महत्त्वपूर्ण आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार याचाही मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे."

"कोकणवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. मराठवाड्यातील २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध करण्यास महायुती सरकारचे प्राधान्य आहे. यामुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे" असे विखे पाटील म्हणाले.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृषी क्षेत्रातील सुधारण्याचे मार्गदर्शन ५० हजार शेतकऱ्यांना होण्यासाठी घेतलेला निर्णय सुद्धा महत्त्वाचा ठरेल. शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व हरित ऊर्जेतून सौरपंप योजनेला गती मिळेल."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे योजनेला महायुती सरकारने मिशन मोडवर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. घरासाठी सौरऊर्जा संच उपलब्ध करून देण्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान निर्णय सुद्धा लाभार्थींना दिलासा देणारा ठरणार आहे. महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देतानाच २४ लाख लखपती दिदी बनविण्याचे उद्दिष्ट महायुती सरकार पूर्ण करेल." असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पास मान्यता

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आली. यास अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रुपये असणार आहे. ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर इतके लाभक्षेत्र असणार आहे. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ७ हजार ५०० कोटी रुपये असेल.

नदीजोडमुळे पाणी उपलब्ध

दमणगंगा -एकदरे -गोदावरी या २ हजार ३०० कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. तापी महापुनर्भरण हा १९ हजार ३०० कोटी रुपये किमतीचा सिंचन-उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT