Maharashtra Budget 2025: तीन घोषणांमुळे विदर्भाच्या शेती क्षेत्राला मिळेल बूस्ट

Announcement to set up an Agro Logistics Hub: राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भातील कृषी क्षेत्रासाठी तीन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गडचिरोलीत रेशीम कोष बाजार, देवलापारला देशी गोवंश संशोधन केंद्र आणि विदर्भात ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
Maharashtra Budget 2025
Maharashtra Budget 2025Agrowon
Published on
Updated on

Nagpur News: गडचिरोलीत रेशीम कोष बाजार, देवलापारला देशी गोवंश संशोधन केंद्र त्यासोबतच ॲग्रो लॉजीस्टीक हब अशा घोषणा सोमवारी (ता. १०) सादर झालेल्या अर्थसंकल्पी अभिभाषणात अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या. यामुळे विदर्भातील कृषी क्षेत्राला बूस्ट मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. देवलापार येथील गोवंश संशोधन केंद्रातून येत्या दहा वर्षांत रसायनमुक्‍त शेतीचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

राज्याच्या इतर भागात पारंपरिक पद्धतीने तुती लागवड करुन रेशीम कोश उत्पादन केले जाते. याउलट पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांत रेशीम शेतीला मर्यादा आहेत. वनक्षेत्र अधिक असल्याने या भागात ऐन आणि अर्जुन या झाडावर रेशीम अळ्यांचे संगोपन केले जाते.

Maharashtra Budget 2025
Maharashtra budget 2025: अजित पवारांचा अर्थसंकल्प, निवडणुकीत दिलेली आश्वासने हवेत?

त्याकरिता १८ हजार ८६० हेक्‍टर जमीन क्षेत्रात ऐन आणि अर्जुनाची वृक्ष लागवड वनविभागाच्या माध्यमातून केली आहे. प्रति शेतकरी दोन हेक्‍टर जमीन दिली जाते. त्या माध्यमातून टसर रेशीमचे उत्पादन होते. चार जिल्ह्यांत मिळून दहा टन इतके टसर रेशीम उत्पादन होत असल्याची माहिती रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी दिली.

Maharashtra Budget 2025
Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पात नमो योजनेच्या हप्त्यातील वाढीला बगल; शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतिक्षा

परंतु रेशीम कोश बाजार नसल्याच्या परिणामी खासगी व्यापाऱ्यांना हा कोष विकावा लागतो. त्यांच्याकडून अपेक्षित दर मिळत नाही आणि या व्यवहारात आदिवासी टसर रेशीम उत्पादकांचे आर्थिक शोषण होते. टसर रेशीम उत्पादनासाठी यावर्षी १६ हजार रुपये खंडी (चार रुपये प्रति कोष) असा दर मिळाला. आरमोरी (गडचिरोली) येथे रेशीम कोष बाजार प्रस्तावित आहे. त्याचा फायदा टसर रेशीम उत्पादकांना होणार आहे.

ॲग्री लॉजीस्टीक हब

विदर्भात ॲग्री लॉजीस्टीक हब उभारणीची घोषणा करण्यात आली. वर्धा येथे ड्रायपोर्ट प्रस्तावित आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यासोबतच लॉजीस्टीक हबच्या माध्यमातून देखील निर्यातीला बूस्ट मिळेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com