Heat Impact On Crops  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Drop : उन्हाच्या चटक्याने फळपिकांत फळगळ

Heat Impact On Crop : यंदा जानेवारीच्या शेवटापर्यंत हवामानाच्या अनुकूलतेमुळे आंबा आणि मोसंबी पिकास चांगली फुलधारणा झालेली होती, परंतु आधी फेब्रुवारीतील अन् आता मार्चच्या मध्यांन्हात वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात आंबा, मोसंबी व इतर फळ पिकांमध्ये फळगळ वाढली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : यंदा जानेवारीच्या शेवटापर्यंत हवामानाच्या अनुकूलतेमुळे आंबा आणि मोसंबी पिकास चांगली फुलधारणा झालेली होती, परंतु आधी फेब्रुवारीतील अन् आता मार्चच्या मध्यांन्हात वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात आंबा, मोसंबी व इतर फळ पिकांमध्ये फळगळ वाढली आहे. धन केंद्रांच्या आजी माजी तज्ज्ञांनी रविवारी (ता. २३) थेट बागांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

केसर आंबा गुणवत्ता केंद्रातर्फे ढोरकिन (ता. पैठण) येथे रविवारी आंबा-मोसंबी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन कऱण्यात आले होते. या भेटीत हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, आंबा बागायतदार अशोक सिनगारे, अजय कांबळे, संजय कुमावत, मोसंबी उत्पादक दादासाहेब पाचे (नारायणगाव), परमेश्वर राऊत आदीं सहभागी झाले होते.

जालना व संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबी बागेत फळगळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पक्वतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आंबा फळाला सनबर्नचा धोका वाढला आहे. या प्रक्षेत्र भेटी दरम्यान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की वाढत्या तापमानाने राज्यातील आंबा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष आदी पिकांवर विपरित परिणाम होत आहे. बहुतांश बागांमध्ये फळांची गळ होणे, फळे तडकणे, फळे भाजणे, रोग-किडींचा प्रकोप आदी प्रकार दिसून येत आहेत.

हे टाळण्यासाठी फळपिकांना सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेस गरजेनुसार वाफसा स्थितीत पाणी देण्याची व्यवस्था करावी. बागांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करणे गरजेचे आहे. तसेच आंबा फळांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या फळांना पेपर बॅग लावणे आवश्यक आहे.

फळबाग लागवडीतील रोपांचे कडक उन्हामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी खोडास बोर्डोपेस्ट लावणे गरजेचे आहे. फळगळ टाळण्यासाठी युरिया (२० ग्राम) अधिक एनएए (२० मिलीग्रॅम) अधिक पोटॅशियम नायट्रेट (१० ग्राम) प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी, फळमाशी नियंत्रणासाठी आंबा पिकात रक्षक रासायनिक सापळा वापरणे फायदेशीर ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT