Orange Fruit Drop Funds: "संत्रा फळगळतीसाठी १६५ कोटींचा निधी; शेतकऱ्यांना दिलासा"

Agriculture Funds: संत्रा फळगतीची दखल घेत राज्य शासनाकडून भरपाईपोटी १६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा तसेच आर्वी (वर्धा) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.
Orange
OrangeAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : संत्रा फळगतीची दखल घेत राज्य शासनाकडून भरपाईपोटी १६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा तसेच आर्वी (वर्धा) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याला यापूर्वीच २३ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने या शासन आदेशात नागपूरचा समावेश करण्यात आला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

ऑगस्ट २०२४ मध्ये वातावरणातील बदल, पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे संत्रा बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला होता. त्याचा फटका बसत संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्याची दखल घेत शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत होती. शासनाकडूनही संत्रा बागायतदारांच्या या मागणीच्या अनुषंगाने मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु या मदतनिधीतून नागपूर जिल्हा वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्‍त होत आहे.

Orange
Orange Import Duty : संत्रा आयात शुल्कात बांगलादेशकडून पुन्हा वाढ

व्यापाऱ्यांच्या घशात जाणारा निधी रोखला

बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्याच्या परिणामी नागपुरी संत्रा निर्यात प्रभावित झाली होती. त्यामुळे देशांतर्गत संत्रा दर कोसळले. त्याची दखल घेत १७० कोटी रुपयांची भरपाई पणन मंडळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. दर कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र व्यापारी हित जपत शेतकऱ्यांऐवजी निर्यातदार व्यापाऱ्यांसाठी निधी वितरणाचा आदेश काढला होता. विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला ब्रेक लावला होता. आता हा निधी फळगळती क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

या भरपाईत नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे. मात्र काटोल तहसीलदार श्री. रणवीर यांनी नागपूर जिल्ह्याला यापूर्वीच २३ लाख रुपयांचा निधी भरपाईपोटी मिळाल्याचे सांगितले. आता पुन्हा काटोलसाठी चार कोटी ७३ लाख, तर नरखेड तालुक्यासाठी पाच कोटी ३९ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Orange
Orange Rate : मृग हंगामातील संत्रा फळांना ५० हजार रुपये टनाचा दर

...अशी मिळणार मदत (बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये), शेतकरी संख्या, निधी (कोटी रुपयांत)

वर्धा : ३०१३.८५-- ५९३३--१०८४.९८

अमरावती : ३७७९३.८--४१९११--१३४६१.८३

अकोला : ३०२९.५०--३४३३--१०९०.६२

बुलडाणा : २६२६.८०--३८५२--९४५.६५

एकूण : ४६०६४.१२--५५१२९--१६५८३.०८

ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्याला संत्रा फळगळतीसाठी यापूर्वीच मदत मिळाली आहे. त्यामुळे नव्या शासन आदेशात नागपूर जिल्ह्याचा उल्लेख नाही. तरीसुद्धा संत्रा फळगळतीसाठी आता पुन्हा चार कोटी ७३ रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
चरणसिंग ठाकूर, आमदार, काटोल मतदार संघ, नागपूर
बांगलादेशची निर्यात प्रभावित झाल्यानंतर शेतकऱ्यांऐवजी निर्यातदार व्यापाऱ्यांना मदत दिली जाणार होती. त्याविरोधात पाठपुरावा केल्यानंतर आता तोच निधी फळगळतीधारक बागायतदारांना दिला जाणार आहे. परंतु यातून ऑरेंज सिटी नागपूरला का वगळण्यात आले हे अनाकलनीय आहे.
मनोज जवंजाळ, संत्रा बागायतदार, काटोल, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com