Mango Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cashew Compensation : आंबा, काजू बागायतदारांना सरसकट भरपाई द्या

Sindhudurg Farmer : वाढलेले तापमान, अवकाळी पाऊस, सतत ढगाळ वातावरण यामुळे सिंधुदुर्गातील आंबा, काजू उत्पादनात प्रचंड घट झाली असून बागायतदार कर्जबाजारी होण्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : वाढलेले तापमान, अवकाळी पाऊस, सतत ढगाळ वातावरण यामुळे सिंधुदुर्गातील आंबा, काजू उत्पादनात प्रचंड घट झाली असून बागायतदार कर्जबाजारी होण्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाने आंबा, काजू बागायतदारांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गातील आंबा, काजू पिकांचे उत्पादन या वर्षी २० ते २५ टक्केच राहणार आहे. या वर्षी लांबलेल्या पावसामुळे दोनही पिकांचा कालावधी बदलला.विलंबाने झाडांना पालवी मोहोर आला. दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानवाढीला प्रारंभ झाला. ४ फेब्रुवारीपासून ३७ अंश सेल्शियस इतके तापमान राहीले.

तापमानवाढीचा कहर आतापर्यंत सुरू असून, त्यामध्ये आंबा,काजू बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, वादळीवारे, धुके यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचा एकूणच परिणाम आंबा, काजू पिकांच्या उत्पादनावर झाला आहे. काजू पिकांमध्ये तर यावर्षी फळ पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुभार्व दिसून आला.

सरासरी २० ते २५ टक्केच पीक शेतकऱ्यांना मिळणारआहे.ज्यातून शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील भागणार नाही. त्यामुळे शासनाने आंबा,काजू पीक विमा परताव्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, मेघश्याम भगत, शशिकांत आरोलकर, संदीप तेंडोलकर, महेश काळोजी आदींनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT