Agriculture Theft Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Equipment Theft : कृषी साहित्यांची चोरी थांबणार कधी? शेतकऱ्यांना चिंता...

Agriculture Tool Theft : खानदेशात केळी पट्ट्यासह विविध भागांत शिवारातून शेती साहित्य, कृषिपंपांची यंत्रणा चोरी वाढली आहे. ठिबक संच, शेती पंपांच्या केबल व अन्य शेती साहित्य चोरी वाढली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळी पट्ट्यासह विविध भागांत शिवारातून शेती साहित्य, कृषिपंपांची यंत्रणा चोरी वाढली आहे. ठिबक संच, शेती पंपांच्या केबल व अन्य शेती साहित्य चोरी वाढली आहे. केळी घड कापून नुकसान करणे व अन्य प्रकारही सुरू आहेत.

शेतकरी वारंवार याबाबत तक्रारी करीत आहेत. परंतु शिवारात पोलिस गस्त होत नाही व यासंबंधीच्या तक्रारींचा तपास पूर्ण करून पुढील कारवाई तसेच शेतातील शेती पंपांवरील यंत्रणा, शेती पंपांचे स्टार्टर आदींची नासधूस, तोडफोड करण्याचे प्रकार वाढले असून, शेतकरी जेरीस आले आहेत. अनेक तक्रारी यावर करण्यात आल्या आहेत. पण पोलिसांकडून तपास व पुढील कारवाई झालेली नाही.

किरकोळ नुकसान व तक्रार मानून त्याकडे पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावल, रावेर, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागात शेतीपंपांची यंत्रणा, ठिबक रातोरात शेतातून चोरण्याचे प्रकार सुरू आहेत. यावलमधील सांगवी व अन्य गावांत अलीकडे शेतात केळी घड कापूस फेकल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. भालोद येथे मध्यंतरी मगनलाल गडे यांच्या शेतातील विहिरीतील शेतीपंप, केबल, सर्व्हिस केबल चोरीस गेली होती.

भालोदमधीलच अशोक महाजन यांच्या शेतातील शेती पंप, केबल चोरट्यांनी लांबविले होते. असेच प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. रोज शेतात चोऱ्या होतात. पण तपास लागत नाही. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी फुपनगरी शिवारातही नासधूस व कृषिपंप सर्व्हिस तारांची चोरी झाली होती. पोलिस शेतातील चोरीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतात. पण पुढे या प्रकरणाचा तपास, पाहणी, चौकशी असे कोणतेच सोपस्कार पोलिस करीत नाहीत.

यामुळे चोरट्यांचे फावते व हे प्रकार सुरूच आहेत. आता शेतात केळी, पपई, भाजीपाला पिके आहेत. तसेच हळद, कापूस लागवडीचे दिवस आहेत. अशात शेतीपंपांची यंत्रणा चोरीस गेल्यास सिंचनाचे काम एक-दोन दिवस बंद होते. उष्णता वाढली आहे.

पिकास एक दिवसदेखील पाणी देण्यास उशीर झाल्यास त्याचे नुकसान होते. या स्थितीत किंवा चोरीच्या घटनांत पिके वाचवायची कशी असा प्रश्‍न आहे. नैसर्गिक समस्या असतानाच चोरी, नासधूस यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात रोज शेतीपंप, केबल चोरी होते. याबाबत पोलिस यंत्रणांनी चोख तपासणी करून संबंधितांना शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crisis: हवामान बदलाचा फटका; पाऊस, हिमवृष्टीअभावी उत्तराखंडमधील शेती धोक्यात, सफरचंद उत्पादन घटणार

Soil Health: जमिनीची काळजी घ्या, जमीन पिकाची काळजी घेईल

Jowar Hurda: नेवाशातील हुरड्याचा दिल्लीकरांकडून आस्वाद

Urea Fertilizer: युरियाची साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री रडारवर

Climate Change : ला नीना असूनही उष्णतेचा कहर; २०२५ तिसरे सर्वाधिक उष्ण वर्ष

SCROLL FOR NEXT