Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

Agriculture News : काही भागात शेतातून केळी घड कापून त्याची परस्पर विक्रीही केली जाते. कापूस वेचणी रात्रीच्या वेळेस करून त्याची किरकोळ बाजारात विविध भागात विक्री करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Agriculture Theft
Agriculture TheftAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात आता शिवारात केळी, कापसाची चोरी सुरू आहे. केळीला दर बरे आहेत. कापसाची आवकही दिसत आहे. अशात चोरटेही सक्रिय झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

काही भागात शेतातून केळी घड कापून त्याची परस्पर विक्रीही केली जाते. कापूस वेचणी रात्रीच्या वेळेस करून त्याची किरकोळ बाजारात विविध भागात विक्री करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवारातून कृषिपंप यंत्रणा, केबल, अवजारे, ठिबक,पाईप आदींची राजरोस चोरी सुरू होती. आता चोरटे कापूस, केळी लांबवू लागले आहेत.

Agriculture Theft
Theft News : कांदा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला अडवून सहा लाख पळविले

अजूनही विविध भागात रोज शिवारातून ठिबक, तुषार संचांची चोरी होत आहे. पोलिसात तक्रारी येतात, पण त्याचा तपास लागत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असून, हतबल झाले आहेत. पोलिस सक्रिय होऊन हे प्रकार रोखत नाहीत. यामुळे अडचणी अधिक आहेत. शेतातील स्प्रिंकलर तोट्या चोरीला गेल्याची घटना रोज कुठेतरी उघडकीस येते.

शेतकऱ्यांना आर्थिक फटक्यासह रब्बी पिके सिंचनाचाही प्रश्न उद्भवला आहे. भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कलिंगड, केळी, मका, कांदा व अन्य पिकांची लागवड केली आहे.

या पिकांच्या सिंचनासाठी स्प्रिंकलर पाइप आणि तोट्या, ठिबक संच बसविल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात तुषार संचाच्या तांब्याच्या तोट्या रात्रीच्या वेळेस चोरटे नेतात. तसेच शेतात ठेवलेली ठिबकही वाहनात भरून चोरून नेतात.

Agriculture Theft
Agriculture Pump Cable Theft : भराडी बंधाऱ्यानजीक कृषिपंपाच्या विद्युत केबलची चोरी

या चोरीमुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, जामनेर, पाचोरा आदी अनेक भागांत ही समस्या आहे. ग्रामीण क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक पोलिस ठाण्यात ठिबक चोरीची तक्रार प्रलंबित दिसते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केळीची राखणदारी

चोरटे दुपारी, सायंकाळी रेकी करतात. रात्री थेट मालवाहू वाहन शेतात आणतात. केळीचे घड कापून ते वाहनात भरून केळी वेफर्स निर्मात्यांना विकले जातात, असा आरोप शेतकरी करीत आहेत. वाहनातून राजरोसपणे ठिबक, तुषार संच भरून नेतात. ही समस्या असतानाच केबल चोरटेही सक्रिय झाले आहेत. केबलची चोरीदेखील वाढली असून, शेतकऱ्यांना रात्रीअपरात्री शेतात पाहारा देण्यासाठी किंवा पाहणी करण्यासाठी जावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com