Rice Research Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Team Agrowon

'B1' Vitamin in Rice : जिनेव्हा विद्यापीठातील संशोधकांनी ईटीएच झुरिच आणि तैवान येथील राष्ट्रीय चुंग हसिंग विद्यापीठातील संशोधकांसह भातामध्येच त्याचा अंतर्भाव करण्यात यश मिळवले आहे. यामुळे उत्पादनामध्ये कोणताही फरक पडत नसल्याने जीवनसत्त्व ‘बी १’ च्या कमतरतेविरुद्धच्या लढाईमध्ये हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे संशोधन ‘प्लांट बायोटेक्नॉलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जगभरातील मोठ्या लोकसंख्येचे भात किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ हे मुख्य अन्न अन्न आहे. माणसांच्या आरोग्यासाठी विविध जीवनसत्त्वे आवश्यक असतात. बहुतेक जीवनसत्त्वे मानवी शरीरामध्ये तयार केली जात नसल्याने ती आहारातून घेण्याशिवाय पर्याय राहत नाही.

त्यातही ज्या भागामध्ये तांदूळ हे तृणधान्य आहाराचा एकमेव स्रोत आहे. अशा ठिकाणी जीवनसत्त्व ‘बी १’ (थायमिन)ची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळले. या लोकसंख्येमध्ये कमतरतेमुळे बेरीबेरीसारखे रोग, मानसिक चिंताग्रस्तता आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग मोठ्या प्रमाणात आढळतात.

प्रक्रियेदरम्यान जीवनसत्त्व

बी १ नष्ट होते...

विशेषतः आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय देशांमध्ये भात हे मुख्य पीक आहे. मुळात तांदळाच्या दाण्यांमध्ये जीवनसत्त्व ‘बी १’ कमी असते. त्यातच कोंडा काढून पॉलिशिंगच्या प्रक्रियेमध्ये त्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक कमी होते. थोडक्यात, पॉलिशिंगच्या प्रक्रियेमुळे जीवनसत्त्व ‘बी १’ची कमतरता अधिकच वाढते.

तेरेसा फिट्झपॅट्रिक यांच्या प्रयोगशाळेमध्ये कार्यरत संशोधक वनस्पतींमधील जीवनसत्त्व जैवसंश्‍लेषण आणि त्याचा ऱ्हास होण्याचे मार्ग यावर संशोधन करत आहेत. यापूर्वी या संदर्भात वेगवेगळ्या संशोधकांनी केलेल्या प्रयत्नामध्ये भाताच्या पाने आणि कोंड्यातील जीवनसत्त्व ‘बी १’चे प्रमाण वाढविण्यात यश आले होते. मात्र हे भाग खाद्य नसल्याने समस्या तशीच होती.

त्यामुळे तेरेसा व त्यांच्या गटाने ईटीएच झुरिच आणि तैवान येथील संशोधकांसह तांदळाच्या खाद्य भागातील जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. शास्त्रज्ञांनी तांदळाच्या वंशावळीतून जीवनसत्त्व ‘बी १’ वाढविण्यासाठी कारणीभूत जनुकांना अधिक स्पष्टपणे कार्यरत करणाऱ्या जाती तयार करण्यात आल्या. त्याचे पीक काचघरांमध्ये घेऊन भाताची कापणी करण्यात आली. पॉलिश केल्यानंतरही तांदळाच्या दाण्यांमध्ये जीवनसत्त्व बी १ चे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले.

आश्‍वासक प्रायोगिक पिके

या जातींच्या लागवडीचे प्रयोग तैवानमध्येही करण्यात आले. या वेळी कृषी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कोणतेही बदल न केले नाहीत. झाडाची उंची, प्रत्येक झाडाच्या देठांची संख्या, धान्याचे वजन आणि प्रजनन क्षमता या सर्वांची तुलना करण्यात आली. पीक उत्पादनामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र सुधारित जातीच्या तांदळाच्या दाण्यांमध्ये जीवनसत्त्व ‘बी १’चे प्रमाण पॉलिशिंगनंतरही ३ ते ४ ने पटीने अधिक होते.

कमतरतेवर प्रभावी उपाय :

एटीएचमधील शास्त्रज्ञ विल्हेल्म ग्रुइसेम यांनी सांगितले, की या सुधारित पिकातून मिळालेल्या ३०० ग्रॅम भाताचा आहारात समावेश केल्यास प्रौढ व्यक्तीला जीवनसत्त्व ‘बी १’च्या प्रौढाच्या शिफारशीच्या सुमारे एक तृतीयांश बी१ उपलब्ध होते.

हाच भात दैनंदिन आहारामध्ये घेतल्यास ‘बी १’च्या कमतरतेची समस्या बऱ्यापैकी दूर होण्यास मदत होईल. आता पुढील टप्प्यामध्ये जीवनसत्त्व ‘बी १’ अधिक असलेल्या जातींचे गुणधर्म व्यावसायिक जातींमध्ये आणण्यासंदर्भात काम करण्यात येईल.

एकमताअभावी संशोधनाला खीळ...

फिलिपिन्स मधील दक्षिण मनिला येथील लगुना प्रांतातील लॉस बॅनोस शहरातील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेच्या (IRRI) या केंद्रामध्ये अधिक पोषक अशा जनुकीय सुधारित गोल्डन भाताच्या चाचण्या घेतल्या जात होत्या.

मात्र १७ एप्रिल रोजी फिलिपिन्स कोर्टाने लोकांच्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेबाबत अद्याप शास्त्रज्ञांमध्येच एकमत नसल्याचा दावा करत जनुकीय सुधारित पिकांच्या लागवडीवर बंदी आणली आहे. ही बंदी जनुकीय सुधारित वांग्यासाठीसुद्धा लागू असेल.

(स्रोत : टेड अल्जिबे, वृत्तसंस्था.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT