Grape Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Variety : पेटंटेड द्राक्ष वाणांनी आणली नवी संधी

Grape Farming : गेल्या पाच वर्षांत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका कायम आहे. आर्थिक कोंडी झाल्याने काहींनी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविण्याच पाऊल उचलले. ‘ज्याप्रमाणे अंधार दाटावा, त्यात गडद काळोखाची रात्र मोठी असावी,’ अशी परिस्थिती समोर होती.

मुकुंद पिंगळे

मुकुंद पिंगळे

New Opportunities : वातावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च, घटलेली उत्पादकता व गुणवत्तेअभावी कमी दर असे द्राक्ष शेतीचे गुंते वाढले. परिणामी उत्पादकांमध्ये नैराश्य आले. सध्या नॉन पेटंटेड पारंपरिक सफेद तसेच मोजके रंगीत द्राक्ष वाण आहेत, त्यातून शाश्वत संधी नाही.

या बाजू अभ्यासून द्राक्ष उद्योगात पहिल्यांदाच १० वर्षांपूर्वी स्पर्धात्मक वाण उपलब्धतेसाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने ‘मिशन मोड’वर काम सुरू केले. हवामान अनुकूल, कमी उत्पादन खर्च, गुणवत्तापूर्ण उत्पादन व उत्पादकता अशा बाबी विचारात घेऊन जागतिक दर्जाचा ‘आरा’ हा पेटंटेड द्राक्ष वाण पहिल्यांदा या मातीत रुजला. आता आंतरराष्ट्रीय पैदासकारांमार्फत ३५ पेटंटेड वाणांची उपलब्धता झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी ‘ग्राफा, ‘एसएनएफएल’, ‘इटुम’, ‘ब्लूमफ्रेश’ आदी जागतिक द्राक्ष पैदासकारांचे वाण उपलब्ध आहेत. सह्याद्री फार्म्ससह अनेक निर्यातदार, मोठे द्राक्ष बागायतदार यात पुढे येत आहेत. पुढच्या दोन वर्षात हे बदल ठळकपणे दिसतील असा अनेकांचा विश्वास आहे.

भविष्यातील द्राक्ष संधी ओळखून प्रयोगशील शेतकरी पैदासकारांची लागवडीपूर्व रॉयल्टी भरून नव्या वाणांकडे वळताना दिसून येत आहे. प्रमुख स्पर्धक द्राक्ष उत्पादक देशांनी दहा ते पंधरा वर्षांत पारंपरिक वाण बदलून नव्या ‘पेटंटेड’ वाणांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. संधी ओळखून काम केल्यास २०३० पर्यंत पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो.
विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी
नव्या पेटंटेड द्राक्ष वाणांचे अतिशय उज्वल भविष्य असून हे वाण बदलत्या द्राक्ष शेतीत महत्त्वपूर्ण ठरतील यात शंका नाही. मात्र हे दुधारी तलवारीसारखे आहेत, त्यामुळे पारंपरिक वाणांसारखे कामकाज चालणार नाही. नव्या वाणांची हवामान अनुकूलतेनुसार निवड तसेच शास्त्रीय पद्धतीने कामकाज होणे गरजेचे आहे. काही वाणांचे लागवडीपश्‍चात चांगले परिणाम आलेले आहेत. हा मोठा बदल असून शेतकरी वर्गात उत्सुकता आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात पुढे जाण्यासाठी हाच मार्ग दिसतोय.
अमित पडोळ, द्राक्षतज्ज्ञ व निर्यातदार, नाशिक

बदलांचे वाहू लागले वारे...

उपलब्ध झालेल्या पेटंटेड द्राक्ष वाणांच्या प्रक्षेत्र चाचण्या घेऊन लागवडी

वातावरण अनुकूल, कमी उत्पादन खर्च व अधिक उत्पादनक्षम वाणांना पसंदी

रंग, गोडी, कुरकुरीतपणा, आकर्षण व टिकवणक्षमता वाणांना शेतकऱ्यांची पसंती

आकर्षक, प्रतवारीमुळे देशात पहिल्यांदाच शेतात गतवर्षी पेटंटेड द्राक्ष वाणांचे ऑनलाइन लिलाव

शिवार खरेदीत आजवरच्या इतिहासात प्रतिकिलो २०० रुपये उच्चांकी दर मिळाल्याची नोंद

आशादायी चित्र

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी बाजारात मागणी असलेल्या पेटंटेड व नॉन पेटंटेड द्राक्ष वाणांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. राज्यात जवळपास ४.५ लाख एकरांवर द्राक्ष शेतीचा विस्तार झाला. मात्र नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च व हवामान बदल अशा परिस्थितीमुळे काही शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. राज्यात ३० हजार एकरांपर्यंत अंदाजे हे नुकसानीचे प्रमाण आहे.

मात्र पुन्हा नव्या वाणांच्या लागवडीखाली हे क्षेत्र पुन्हा येण्याचे आशादायी चित्र आहे. सर्वच शेतकरी पेटंटेड वाणांच्या लागवडीसाठी रॉयल्टी देऊ शकत नाही, त्यामुळे जागतिक पातळीवर छोट्या पैदासकारांनी विकसित केलेले व ज्यांची पेटंटची मुदत संपली आहे. असे जगभरातील वाण छोट्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही शेतकरी रेड ग्लोब, फ्लेम सीडलेस, क्रिमसन सीडलेस आदी नॉन पेटंटेड वाणांना प्राधान्य देत आहेत; मात्र पेटंटेड वाणांना भविष्य आहे, असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT