
Sangli News : यंदाच्या द्राक्ष हंगामात नैसर्गिक आपत्तीचे संकटावर मात करत राज्यातून द्राक्ष निर्यातीसाठी शेतकरी पुढाकार घेतला आहे. यामुळे निर्यातीसाठी नोंदणी वाढू लागली आहे. आजअखेर २६ हजार १८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नोंदणीसाठी पुढे आले आहेत. यंदाच्या हंगामात रशियाला १० कंटनेर, तर नेदरलॅंडला ५ कंटनेर द्राक्ष निर्यात सुरू झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
राज्यातून गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा वाढता आलेख आहे. युरोपियन देशासह आखाती देशात द्राक्षाची निर्यात होते. गेल्या वर्षी राज्यात पाणीटंचाईचा फटका द्राक्ष पिकाला बसला होता. त्यामुळे फळ छाटणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा साधल्या. गत वर्षीच्या हंगामात युरोपियन देशात १ लाख ५७ हजार टन, तर १ लाख ३७ हजार टन आखाती देशासह अन्य देशात अशी एकूण ३ लाख २४ हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती.
यंदाच्या हंगामात सतत पावसामुळे फळ छाटणी लांबली. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ छाटणी आटोपली. मात्र, परतीच्या पावसामुळे फळ छाटणी केलेल्या द्राक्ष पिकाला फटका बसला. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बागा साधल्या. यंदा नैसर्गिक संटक आले असतानाही राज्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकरी नोंदणी करू लागले आहेत.
यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीची गती वाढली आहे. आजअखेर राज्यातून २६ हजार १८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक नोंदणी नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. त्याखालोखाल सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदाच्या हंगामातील द्राक्षाच्या निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. रशियाला १० कंटेनर, तर नेदरलॅंडमध्ये ५ कंटनेर द्राक्ष पोहोचली आहेत. प्रतिकूल परिस्थिती शेतकरी द्राक्ष निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे यंदा निर्यात वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्हानिहाय द्राक्ष निर्यातीसाठी केलेली नोंदणी
जिल्हा नुतनीकरण नवीन एकूण
अहिल्यानगर २९८ ९४ ३९२
बीड २ ०० २
जालना ४ ०० ४
लातूर ११९ ७ १२६
नाशिक १५०२१ १९०५ १६,९२६
धाराशिव ७१८ ० ७१८
पुणे १९४ १३६ ३३०
रायगड १ ०० १
सांगली ६३७६ ६९७ ७०७३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.