Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : शिरसाई सिंचन योजनेतून खरीप हंगामासाठी आवर्तन

Shirsai Irrigation Scheme : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना गुरुवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या दरम्यान कार्यान्वित केली.

Team Agrowon

Baramati News : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना गुरुवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या दरम्यान कार्यान्वित केली. या योजनेतून लाभार्थी गावात खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येत आहे.

जिरायती भागातील अंजनगाव, जळगाव सुपे, सोनवडी सुपे आदी गावांच्या परिसरात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने पाझर तलाव कोरडे आहेत. त्यामुळे शिरसाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून तलावात पाणी सोडण्याची लाभार्थी शेतकऱ्यांची मागणी होती.

त्यानुसार गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान योजना कार्यान्वित केली आहे. शिरसाई योजनेअंतर्गत उजव्या कालव्याद्वारे अंजनगाव परिसरातील वायसे तलावात पाणी सुरु केले आहे. आवर्तन सुरु करण्यापूर्वी उपसा सिंचन विभागाच्या वतीने जेसीबी मशिनच्या साह्याने कालव्यातील घाण व झाडेझुडपे काढण्यात आली आहेत.

शिरसाई योजनेद्वारे मागणी असेल त्यांना आवर्तन देण्यात येणार असून, संबंधित शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी व चालूची पाणीपट्टीसह मागणी अर्ज भरून सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यानुसार पाणी सोडण्याचे नियोजन करता येईल, अशी माहिती उपसा सिंचन योजनेचे कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT