Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू

Crop Insurance Scheme : मोसंबी पिकासाठी नांदेड जिल्ह्यातील मालेगाव, बारूळ, फुलवळ, कंधार, लिंबगाव, विष्णुपुरी, नाळेश्वर, बारड मंडळाचा समावेश आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंबिया बहार रब्बी सन २०२३-२४ साठी शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना द्राक्ष, मोसंबी, केळी व आंबा या अनुसूचित पिकांकरिता अधिसूचित महसूल मंडळांमध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या कंपनीकडून राबविण्यात येणार आहे. यात अधिसूचित मंडळातील शेतकऱ्यांनी विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मोसंबी पिकासाठी नांदेड जिल्ह्यातील मालेगाव, बारूळ, फुलवळ, कंधार, लिंबगाव, विष्णुपुरी, नाळेश्वर, बारड मंडळाचा समावेश आहे. मोसंबी फळपिकासाठी विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे.

केळी पिकासाठी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, दाभड, मालेगाव, उमरी, ईस्लापुर, शिवनी, किनवट, बोधडी, मरखेल, हाणेगाव, नरंगल, शहापूर, तरोडा बुद्रूक, तुपा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी, नांदेड ग्रामीण, नाळेश्वर, वाजेगाव, बरबडा, भोकर, भोशी, मुदखेड, मुगट, बारड, शेवडी बाजीराव, कापसी बुद्रूक, हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी मंडळाचा समावेश आहे.

केळीसाठी ३१ ऑक्टोबर ही विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. आंबा फळपिकासाठी जिल्ह्यातील मालेगाव, दाभड, कंधार, बारूळ, फुलवळ, पेठवडज, लिंबगाव, मुक्रमाबाद, निवघा, तळणी आदी महसूल मंडळाचा समावेश आहे.

आंबा फळ पिकासाठी ३१ डिसेंबर पर्यंत विमा भरता येणार आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

असे भरावे लागणार पैसे...

आंबिया बहारामध्ये द्राक्षासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १६ हजार रुपये विमा भरावा लागणार आहे. यासाठी तीन लाख वीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. मोसंबी पिकासाठी शेतकऱ्यांना चार हजार चारशे रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. तर हेक्टरी ८० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे.

केळी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार ४०० विमा हप्ता भरावा लागणार आहे. तर हेक्टरी एक लाख ४० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे. आंबा पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २३ हजार १०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. तर यासाठी हेक्टरी एक लाख ४० हजार रुपये विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT