Watermelon Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Rate : कलिंगड दरात सुधारणा

Watermelon Market : खानदेशात कलिंडाच्या दरात मागील काही दिवसांत सुधारणा झाली असून, शेतकऱ्यांना सध्या ११ ते १२ रुपये प्रतिकिलो दर जागेवर किंवा थेट शिवार खरेदीत मिळत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कलिंडाच्या दरात मागील काही दिवसांत सुधारणा झाली असून, शेतकऱ्यांना सध्या ११ ते १२ रुपये प्रतिकिलो दर जागेवर किंवा थेट शिवार खरेदीत मिळत आहेत.

सध्या कलिंगडाची प्रतिदिन १० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक खानदेशात होत आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ही आवक कमी आहे. कारण पाऊस, गारपीट व अन्य समस्यांमुळे कलिंगड पिकाची हानी खानदेशात सर्वत्र झाली आहे.

यातच कमी पाऊस व मागील हंगामातील नुकसान यामुळे यंदा अनेकांनी कलिंगड लागवड टाळली. यंदा खानदेशात केवळ ३०० हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली. मागील हंगामात सुमारे ५०० हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा लागवड घटली तसेच उत्पादनातही घट येत आहे. एकरी १७ ते १८ टन उत्पादन येत आहे. काहींना यापेक्षा कमी उत्पादन येत आहे. अपेक्षित फळे लगडली नव्हती.

खानदेशात फेब्रुवारीत गारपीट व पाऊस झाला. यामुळे चोपडा, पारोळा भागातील कलिंगडाची मोठी हानी झाली. त्यामुळे कलिंगडाची आवक खानदेशात कमी असून, दरांमधील चढउतारही सुरू आहे. कलिंगडाचे सरासरी दर मागील पंधरवड्यात १४ रुपये प्रतिकिलो होते.

त्यात तीन-चार दिवसांत सतत घट झाली व दर १० ते ११ रुपये प्रतिकिलो, असे थेट शिवार खरेदीत मिळत होते. या दरांत मागील दोन दिवसांत थोडी सुधारणा झाली असून दर ११ ते १२ रुपये प्रतिकिलो, असे आहेत. काही शेतकऱ्यांना १२ रुपये ७५ पैसे प्रतिकिलोचा दरही दर्जेदार कलिंगडासाठी मिळाला. कमी लागवडीमुळे आवकेत आणखी घट होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT