Taloda News : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा परिसरात टरबूज लागवडीस सुरवात झाली असून, आता वातावरण निरभ्र राहू लागल्याने शेतकऱ्यांकडून वेलवर्गीय पिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, हे पीक ७० ते ८० दिवसांनंतर ऐन उन्हाळ्यात परिपक्व होणार आहे. त्यामुळे त्या वेळी त्याला चांगला भावही मिळू शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
तळोदा शहर व तालुक्यातील बोरद, मोड, तळवे, रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, गोपाळपूर, रोझवा पुनर्वसन परिसरातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीकडे वळला आहे. तळोदा शहर व परिसरात काही वर्षांपासून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये टरबूज, खरबूज पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती.
परंतु अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या पिकाची सर्वत्र लागवड करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांकडून शेताची उत्तमरीत्या मशागत करण्यात येऊन मल्चिंग पेपर, ठिबकच्या सहाय्याने महागडे बियाणे आणून टरबूज लागवड करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांकडून इतर जिल्ह्यांतून टरबूज रोपे आणून त्यांची लागवड करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांतील ढगाळ वातावरणामुळे महागडे मल्चिंग पेपर, ठिबक, महागडे बियाणे, लागवड मंजुरी, फवारणीचा खर्च याबाबत विचार करता शेतकऱ्यांकडून टरबुजाचे पीक घेणे टाळले जात होते; परंतु आता त्याची लागवड करण्यात येत असून, टरबुजाचे हे पीक ७० ते ८० दिवसांनंतर ऐन उन्हाळ्यात परिपक्व होणार आहे. त्यामुळे त्या वेळी त्याला चांगला भावही मिळू शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.