Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : कृषी वीजपंप बिलांची दुरुस्ती करून द्या

Agriculture Pump : कृषी वीजपंपाची अधिक येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे यापूर्वीही ५२ शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज जमा करण्यात आले होते.

Team Agrowon

Nashik News : कृषीपंपाचे वीज मीटर व बिलात दुरुस्ती करून मिळण्याबाबत सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नाशिक परिमंडळ कार्यालय, नाशिक रोड येथे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासोबत चर्चा करून निवेदन वेदन व स्मरणपत्र देण्यात आले.

कृषी वीजपंपाची अधिक येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे यापूर्वीही ५२ शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज जमा करण्यात आले होते. तर आता २६ शेतकऱ्यांचे अर्ज जमा करण्यात आले. याबाबत डॉ.कराड व मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याशी चर्चा झाली. मागील ७५ दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही.

याव्यतिरिक्त सोबत २८ शेतकऱ्यांचे नवीन तक्रार अर्ज व वीज बिले सादर करण्यात आले.आता ७८ तक्रारअर्ज जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आतातरी महावितरण या याप्रश्नी लक्ष घालणार का? हा सवाल उपस्थित होत आहे.

यावेळी डॉ. कराड, यांच्यासोबत तानाजी गवळी, चंद्रभान कोंबडे, दर्शन लड्डा, भास्कर पोरजे, शिवराम चव्हाण, झुंबर ढेमसे, विष्णू दगू कोंबडे, युवराज पाटील, गौतम कोंगळे व पाथर्डी पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

शेतकऱ्यांना वीज मीटर बसवण्यात यावी.

वीज मीटर खराब आहे ते बदलून मिळावे.

वाढीव लोड हा जुन्या मागणीनुसार सुधारून मिळावा.

बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार मिळावे

कृषी धोरण २०२०चे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Village Project : राज्यात ७५ स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज होणार; पाच जिल्ह्यातील गावांचा समावेश, शासन निर्णय जारी

Farmers Agitation: मक्याचा लिलाव पाडला बंद

Agriculture Development: ‘आयएएस’ करतील शेतीचा कायापालट

Eggplant Farming: भरीताच्या वांग्यासाठी पहिले नाव बामणोदचे

Local Body Governance: स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय

SCROLL FOR NEXT