Agriculture Electricity : विजेअभावी सुकणार नाहीत पिके

Electricity Transformer : ट्रान्स्फॉर्मर जुने झाले, नादुरुस्त झाले तर त्यात बिघाड होतो. यामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही.
Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity Connectionagrowon

Chhatrapati Sambhajinagar News : ट्रान्स्फॉर्मर जुने झाले, नादुरुस्त झाले तर त्यात बिघाड होतो. यामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी, उत्पन्नावर परिणाम होतो. यामुळे शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी राज्यातील नादुरुस्त व १५ वर्षांपेक्षा जास्त जुने झालेले ३४ हजार ६५३ ट्रान्सफॉर्मर तीन वर्षांत बदलण्यात येणार आहेत.

ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासाठी व ऑइलसाठी राज्य सरकारकडून एक हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. महावितरणकडून राज्यातील दोन कोटी ९७ लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. यामध्ये ४५ लाख कृषिपंपधारक असून, त्यात दरवर्षी एक लाख कृषिपंप ग्राहकांची वाढ होत आहेत.

Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity Issue : विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिकांना देता येईना

ट्रान्स्फॉर्मरमध्ये सतत बिघाड होण्यामुळे शेती आणि बिगरशेती ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. वीज नसल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यात येतात.

यासाठी यांना नियमित व दर्जेदार वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर तातडीने बदलण्यासाठी निरंतर वीज योजनेला मान्यता मिळाली आहे.

योजनेअंतर्गत एक हजार १६० कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारला मंजुरी दिली आहे. तीन वर्षांत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्या वर्षी २०० कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी ४८० कोटी आणि तिसऱ्या वर्षी ४८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या याबाबतच्या शासन आदेशात म्हटले आहे.

Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity : कृषी पंपाच्या पाच हजार नव्या वीज जोडण्या रखडल्या

तीन वर्षांमध्ये ३४ हजार ६५३ ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येतील. यासाठी एक हजार १६३ कोटी खर्चाची तरतूद आहे. तीन वर्षांसाठी ६३ हजार १०० आणि २०० केव्हीच्या ट्रान्स्फॉर्मरसाठी २४ हजार २८१ किलोलीटर इंधन लागणार आहे. यासाठी ३४० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

इंधन बदलण्यासाठी ३४० कोटी रुपये

ट्रान्स्फॉर्मरचे इंधन बदलण्यासाठी आणि त्याच्या क्षमतेएवढी पातळी करण्यासाठी या योजनेअंतर्गत ३४० कोटीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. या वर्षी १०० कोटी आणि पुढील दोन वर्षे प्रत्येकी १२० कोटी असा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com