Talathi Office Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Department : तलाठ्यांवर अतिरिक्त गावांची जबाबदारी वाढली

खातेदारांची संख्यावाढ झाल्यामुळे सज्जांची फोड करण्यात आली. तालुक्यात एकूण दहा महसूल मंडळे यापूर्वी होती.

Team Agrowon

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात तब्बल सहाव्या वर्षात नवीन महसूल मंडळाची, तलाठी सज्जांची फोड व पुनर्रचना करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन ३७ तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली आहे, तर सात नवीन महसूल मंडळे (Revenue Circle) अस्तित्वात येणार आहेत.

खातेदारांची संख्यावाढ झाल्यामुळे सज्जांची फोड करण्यात आली. तालुक्यात एकूण दहा महसूल मंडळे यापूर्वी होती.

आता १७ महसूल मंडळे झाली आहेत, तर ६२ तलाठी सज्जांची संख्या ९९ सज्जांवर पोहोचली आहे. तसे आदेश नुकतेच शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.

महसूल मंडळे, तलाठी सज्जांची फोड याबाबत शासन निर्णय २०१७ पासून झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंडळे, सज्जाफोड कुठे झाली पाहिजे याबाबत आराखडा तयार करून शासनाला देण्यात आला होता.

त्यानुसार शिंदखेडा तालुक्यात आता ९९ तलाठी सज्जा नव्याने अस्तित्वात आले आहेत. सज्जांमध्ये समाविष्ट गावांचे ई-फेरफार, संगणकीय प्रणालीमध्ये ऑनलाइन सातबारा, संगणकीय प्रणाली कामी ६२ ऐवजी ९९ सज्जांची दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश शिरपूर उपविभागीय अधिकारी यांनी काढले आहेत.

त्यानुसार कारवाईची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्यावर अतिरिक्त गावांची जबाबदारी वाढली आहे.

तालुक्यातून ६० तलाठी पदे मंजूर आहेत. सध्या ४३ तलाठी कार्यरत आहेत. आता सज्जा फोडमुळे ९९ सज्जांची निर्मिती झाल्याने तलाठीपदे शासनाने त्वरित भरावीत. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रचलित कार्यपद्धतीनुसार सहा तलाठी सज्जांसाठी एक महसुली मंडळ अधिकाऱ्याचे पद, तर प्रत्येक सज्जासाठी एक तलाठीपद भरण्यात यावे, असे शासनाचे नियोजन आहे.

सज्जांचा कार्यभार पाहता सज्जाफोड होणे आवश्यक होते. ज्या ठिकाणी खातेदारांची संख्या जास्त प्रमाणात होती तेथे विभागणी केली आहे. काम सुरळीत होण्यास मदत होईल. ९९ सज्जांसाठी तेवढ्याच संख्येने तलाठी लागतील.
आशा गांगुर्डे, तहसीलदार, शिंदखेडा, जि. धुळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT