Talathi Sajja : नवीन ८४ तलाठी सज्जे कधी होणार कार्यान्वित?

नांदेड जिल्ह्यात ८४ तलाठी सज्जे आणि १४ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती करण्यात आली. या ८४ सज्जांसाठी तलाठी पदभरती प्रक्रियेला तब्बल पाच वर्ष पूर्ण होऊनही अद्याप मुहूर्त लागलेला नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन पदभरती करावी, अशी मागणी तरुणांकडून होत आहे.
Talathi Sajja
Talathi SajjaAgrowon

नांदेड : नांदेड जिल्ह्यात ८४ तलाठी सज्जे आणि १४ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती करण्यात आली.

या ८४ सज्जांसाठी तलाठी पदभरती प्रक्रियेला तब्बल पाच वर्ष पूर्ण होऊनही अद्याप मुहूर्त लागलेला नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन पदभरती करावी, अशी मागणी तरुणांकडून होत आहे.

नांदेड जिल्ह्यात सहा तलाठी सज्जा (Talathi Sajja) मागे एक मंडळ कार्यालय याप्रमाणे १४ नवीन महसुली मंडळे स्थापन करण्यात आली.

Talathi Sajja
‘ॲग्रो लॉजेस्टिक पार्क’ लवकरच होणार कार्यान्वित

नांदेड, भोकर, देगलूर, किनवट, हदगाव, धर्माबाद, बिलोली, कंधार या उपविभागांनी नवीन मंडळ निर्मितीबाबतचा आपला अहवाल सादर केला होता.

त्यानुसार ८४ नवीन तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात तीन, नगरपालिका क्षेत्रात एक, नगरपंचायत क्षेत्रात सहा, ग्रामीण क्षेत्रात ६२ आणि आदिवासी क्षेत्रात १२ तलाठी सज्जे वाढले आहेत.

त्यामुळे १४ महसुली मंडळांच्या निर्मितीसही शासनाने सहा डिसेंबर २०१७ च्या प्रकाशित झालेल्या राजपत्रानुसार मान्यता दिली आहे.

Talathi Sajja
Agriculture : शेती शोषणमुक्त कधी होणार ?

जिल्ह्यात सध्या असलेल्या ८० महसुल मंडलांमध्ये १४ नव्या महसूल मंडलांचा समावेश झाल्याने एकूण महसुल मंडलांची संख्या ९४ झाली आहे.

जिल्ह्यात वाढलेल्या या ८४ नवीन तलाठी सज्ज्यांसाठी लागणारी ८४ तलाठी पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु भरतीबाबत मात्र महसूल विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

आगामी काळात जिल्ह्यातील नवनिर्मित ८४ तलाठी पदासह जिल्ह्यातील विविध सज्जाची रिक्त असलेली ३५ पदे असे एकूण ११९ तलाठी पदासाठी भरती करावी लागेल.

परंतु याबाबत अद्याप शासनस्तरावर हालचाली दिसून येत नाहीत. नांदेड तालुक्यात नाळेश्वर व वाजेगाव येथे नव्याने महसूल मंडले स्थापन केली आहेत.

कंधार तालुक्यात दिग्रस बु., लोह्यात सावरगाव, धर्माबादमध्ये सिरजखोड, उमरीत धानोरा (बु), हदगावमध्ये बरडशेवाळा, किनवटमध्ये सिंदगी व उमरी बा., देगलूरमध्ये नरंगल (बु), मुखेडमध्ये आंबुलगा बु., भोकरमध्ये भोसी, बिलोलीत रामतीर्थ आणि नायगावमध्ये घुंगराळा येथे मंडळ मंजूर आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com