Transporters Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Transporters Protest: राज्यभरातील विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य वाहनचालक, मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी केला आहे.

गणेश कोरे

Pune News: राज्यभरातील विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य वाहनचालक, मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी केला आहे. बुधवारी (ता. २) पहिल्या दिवशी ५० टक्के तर गुरुवारी (ता. ३) ६० टक्के वाहने संपात सहभागी झाली.

पुढील दोन दिवसांत संप अधिक तीव्र होईल. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने सरकार आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, विविध औद्योगिक वसाहतींमध्ये सर्व वाहने थांबून आहेत. तर शेतीमाल वाहतूक सुरळीत सुरू असून, काही ठिकाणी वाहनांमधील शेतीमाल बाजार समित्यांमध्ये उतरवून काही वाहनचालक, मालक आंदोलनात सहभागी झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

शेतीमाल आणि जीवनावश्‍यक वस्तू वाहतुकीची वाहने संपात सहभागी होऊ नयेत, असे आवाहन आम्ही केले आहे, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘वाहतूक पोलिसांकडून होणारी जबरदस्तीची दंडवसुली थांबवावी, आधी लावलेले दंड माफ करावेत, क्लिनरची (वाहनचालकमदतनीस) सक्ती रद्द करावी, ई-चालानसंबंधीच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

सध्या ग्राहक जास्त असूनही गाड्यांमध्ये नव्याने माल भरला जात नाही. चार दिवसांत बाजारात मालाची कमतरता जाणवू लागण्याची शक्यता आहे.
रायकुमार नहार, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर
बुधवारी शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली होती. मात्र आता तीदेखील आंदोलनात सहभागी होत आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.
डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Issue: कोकणचा ‘आक्रोश’

Gas Shortage Issue: शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार

Pune ZP Budget: पुणे ‘झेडपी’चा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

MSP Reform: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्या: संजय खोडके

Farm Land Dispute: कोलकात्याच्या कंपनीचा शेतजमिनीवर दावा

SCROLL FOR NEXT