
Mumbai News : कोरोना महामारी आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ पुकारलेल्या संपामुळे एसटीचे अडखळलेले चाक पुरते गाळात रुतल्याचे श्वेतपत्रिकेतून जाहीर करण्यात आले. सध्या महामंडळ १० हजार ३२२ कोटी ३२ लाख रुपयांच्या तोट्यात असल्याचे श्वेतपत्रिकेतून समोर आले आहे.
परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीचा लेखाजोखा जनतेसमोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी (ता. २३) श्री. सरनाईक, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच सर्व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली.
बसेसची कमतरता, कालबाह्य बसेस, अनिवार्य व तोट्यातील चालन, अनियमित भाडेवाढ आणि अवैध वाहतूक अशी तोट्याची कारणे महामंडळाने श्वेतपत्रिकेत दिली आहेत. १९८१ पासून प्रवासी संख्येत वाढच झाली नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कोरोना महामारी आणि दीर्घकाळ संपाआधी एसटी महामंडळ ४६०० कोटी रुपये तोट्यात होते. त्यानंतर हा तोटा १० हजार ३२२ कोटी रुपयांवर गेला आहे. महसूल वाढवण्यासाठी एसटी दरवर्षी ५ हजार नवीन बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. यामध्ये उच्च दर्जाच्या व्होल्वो बस भाडे तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत.
सवलत मूल्यावर मदार
सध्या एसटीचे उत्पन्न ६ हजार २८ कोटी ६६ लाख रुपये आहे. सवलत मूल्यापोटी ५ हजार ५१९ कोटी १३ लाख, शासकीय अर्थसाहाय्य ५४० कोटी अचालनीय उत्पन्नापोटी ३४५ कोटी ३ लाख असे १३ हजार ३२ कोटी८२ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न आहे. एकूण उत्पन्नात सवलत मूल्य हे एसटीच्या चालनीय उत्पन्नाच्या कमीअधिक प्रमाणात बरोबरीचे आहे.
जितके उत्पन्न तितका कर्मचारी खर्च
एसटीचे चालनीय उत्पन्न ६ हजार ७२८ कोटी ६६ लाख रुपये आहे. तर कर्मचारी खर्च ६ हजार २४३ कोटी ६९ लाख रुपये आहे. इंधनावरील खर्च ४ हजार ४२ कोटी २ लाख, टोलवरील खर्च एक हजार ८२८ कोटी, ५ लाख, भांडार व इतर सुट्या भागांवरील खर्च ४८५ कोटी ९१ लाख रुपये आहे. एसटीचा एकूण खर्च १४ हजार ५२ कोटी २ लाख रुपये असून १०१९ कोटी ४० लाखांची तूट आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.