Pench Tiger Reserve  Agrowon
ॲग्रो विशेष

Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्प आगमुक्त करण्याचा संकल्प

Forest Fire : पेंच व्याघ्र प्रकल्प आगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार नऊ मार्चपासून उपक्रम सुरू झाला असून, तीन जूनपर्यंत चालणार आहे.

Team Agrowon

Nagpur News : पेंच व्याघ्र प्रकल्प आगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार नऊ मार्चपासून उपक्रम सुरू झाला असून, तीन जूनपर्यंत चालणार आहे. प्रकल्पाशेजारील आणि बफर क्षेत्रातील सर्व सरपंच आणि ग्राम परिसर विकास समिती अध्यक्षांची अग्नी मुक्‍त पेंच कार्यक्रमाबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी मूल्यमापन समिती अग्निशामक हंगामापूर्वी बैठक आयोजित केली होती.

पेंच व्याघ्र प्रकल्पात मागील वर्षीही ‘अग्नी मुक्‍त पेंच’ कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात मागील वर्षी केलेल्या उत्तम कार्यामुळे कोलितमारा क्षेत्राला प्रथम पारितोषिक देण्यात आले. यात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ५० गावे आणि प्रकल्पाच्या सीमेवर असलेले गावांचा समावेश होता. या क्षेत्रातील फक्त सहा हेक्टर जंगल जळाले आणि तीनच घटना घडल्यात. दोन वर्षांच्या तुलनेत आगीमुळे जळालेल्या जंगलाचे प्रमाण १ टक्के कमी झालेले आहे.

जंगलातील आगीच्या घटनांना रोखण्यासाठी ही योजना आहे. २०२१ मध्ये ५४ आगी लागल्यात त्यात ६१९ हेक्टर क्षेत्र जळाले. २०२२ मध्ये ३० घटनांमध्ये ५१५ हेक्टर आणि २०२३ मध्ये तीन घटनांमध्ये सहा हेक्टर जंगल जळाले.

गावांच्या एकूण कामगिरीचे मूल्यमापनासाठी सातपुडा फाउंडेशनचे मंदार पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक संदीप भारती, सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिमगावकर यांची समिती स्थापन केली होती. या कार्यक्रमात पारशिवनी तालुक्‍यातील कोलितमारा, सुरेरा वघाटपेंढरी गावांचे सरपंच व ग्राम परिसर विकास समिती अध्यक्षांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.

गावांमध्ये वनसंरक्षणासाठी आधार तयार करण्यात मदत झाली आहे. जंगलातील आगीच्या घटनांना रोखण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला. जंगलाला आगीपासून दूर राहण्यासाठी आणि ते प्रतिबंधित आणि नियंत्रणासाठी वन विभागाला सहकार्य करण्यासाठीच हा उपक्रम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र

Sugarcane Harvesting: ऊस तोडणीसाठी वेळेचे नियोजन

Rabi Season: रब्बी हंगामात संवर्धित शेती पद्धती फायद्याची

Bogus Onion Seed: बोगस कांदा बियाण्यांचा फटका; शेतकऱ्यांची पोलिसांत धाव

Indian Politics: मौनं सर्वार्थ साधनम् !

SCROLL FOR NEXT