Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्प बफर झोनमध्ये सायकलने भ्रमंती

पेंच प्रशासनाचा पहिल्या टप्प्यात २५ सायकली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ‘टूर द पेंच बफर’ ही ५० किलोमीटरची निसर्गाच्या सानिध्यातील सायकल भ्रमंती राहणार आहे.
Pench Tiger Reserve
Pench Tiger ReserveAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या (Pench Tiger Reserve) बफर क्षेत्रात लवकरच सायकल भ्रमंती सुरू होणार आहे. ५० किलोमीटरची या भ्रमंतीचा श्रीगणेशा कोलितमारा आणि सिल्लारी या दोन ठिकाणांवरून करण्याचा मानस आहे.

या मार्गाला अंतिम मान्यता देण्यात आली असून, त्याची पाहणी लवकरच केली जाणार आहे. महिन्याभरात पर्यटकांना सायकलने पेंच प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात फिरण्याचा आनंद लुटता येणार आहे.

पेंच प्रकल्पाच्या पुढाकाराने साहसी पर्यटनाचा एक मनोरंजक प्रवास सादर करण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.

एक दिवसाचा हा प्रवास असून, सिल्लारी आणि कोलितमारा या दोन्ही ठिकाणी सायकल पर्यटन करण्यास इच्छुक असणाऱ्यांना सायकली पुरविण्यात येणार आहे. स्वतःच्या सायकलही आणण्याची सुविधा राहणार आहे.

Pench Tiger Reserve
Melghat Tiger Reserve : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

...असे आहे नियोजन

पेंच प्रशासनाचा पहिल्या टप्प्यात २५ सायकली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ‘टूर द पेंच बफर’ ही ५० किलोमीटरची निसर्गाच्या सानिध्यातील सायकल भ्रमंती राहणार आहे.

या मनोरंजक साहसी सायकलिंग पर्यटनात १८ वर्षांवरील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. पेंच बफरमधील या भ्रमंती दरम्यान, कृषी क्षेत्र, गाव आणि काही बफरच्या जंगलातून सायकलीने प्रवासाची संधी आहे.

पर्यटकांना स्थानिक संस्कृती

या दरम्यान, पर्यटकांना स्थानिक संस्कृती, स्थानिक भाषा, लोककला, खाद्य संस्कृती, स्थानिक खाद्याचा अस्वादासह संस्कृतीही जाणून घेता येणार आहे. तसेच या भागात पिकविण्यात येणाऱ्या पिकांबद्दलही सविस्तर माहितीही दिली जाणार आहे. पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी यामार्गात दिशादर्शक लावण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मार्गक्रमण करताना सुकर जाणार आहे.

दऱ्याखोऱ्यांतून, डोंगर वाटांचा अनुभव मिळणार

सायकल भ्रमंती दरम्यान, हिरव्या दऱ्याखोऱ्यांतून, डोंगराच्या सुंदर वाटांमधून जाण्याचा अनुभवही मिळणार आहे. या पर्यटनामुळे स्थानिकांना हॉटेल्स, लोकसंस्कृती सादर करणे, सायकल दुरुस्तीसह गाईडच्या माध्यमातून अनेक रोजगार मिळणार आहे.

याशिवाय बाहेरून येणारे पर्यटक स्थानिक दुकानांतून वस्तू खरेदी केल्यास त्यातूनही आर्थिक सक्षमता या भागात येणार आहे.

Pench Tiger Reserve
MPKV Rahuri : कै. बाळासाहेब वाघ यांच्या नावे राहुरी कृषी विद्यापीठात पुरस्कार
पेंच व्याघ्र प्रकल्पात लवकरच सिल्लारी आणि कोलितमारा या दोन प्रवेशद्वाराजवळून सायकल भ्रमंती सुरू करण्यात येणार आहे. मार्गाची प्राथमिक पाहणी झालेली आहे. यास अंतिम रुपही देण्यात आलेले आहे. एकदा मार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शकांची पाहणी केल्यानंतर महिन्याभरात सायकल भ्रमंतीला सुरुवात होईल. पेंचने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला ही आनंदाची बाब आहे.
डॉ. प्रभूनाथ शुक्ला, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com