Yavatmal News: माळखेडा (ता. महागाव) येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू रोडका जाधव यांनी मागील वर्षी २५ जानेवारीला विष प्राशन करून आत्महत्या केली. परंतु आत्महत्येनंतर त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम त्यांची पत्नी रंजना यांना प्रशासकीय दिरंगाईमुळे काढणे अवघड झाले आहे..सलग काही वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्याने विष्णू यांचे शेती उत्पन्न घटले. त्यातच बियाणे, खत, औषधे यांचा वाढता खर्च आणि खासगी व बँक कर्जाचा डोंगर उभा राहिला. ही कर्जफेड अशक्य झाल्याने ते मानसिक तणावाखाली होते. अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर शासनाने अतिवृष्टीच्या निकषांनुसार २३ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजूर केले. ही रक्कम या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली. कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी गरज म्हणून हे पैसे काढण्याचा प्रयत्न त्यांची पत्नी रंजना यांनी केला असता त्यांना बँकेने दाद दिली नाही, असा आरोप आहे. गेल्या एक वर्षापासून याकरिता त्यांना उंबरठे झिजवावे लागत आहे..Farmer Issues: पैशासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच.पतीच्या मृत्यूनंतर रंजना यांच्यावर संसाराची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली आहे. लहान मुले, घरखर्च आणि शेती सांभाळण्याची कसरत करत असतानाच कागदपत्रांची पूर्तता, बँक खाते, वारस दाखले, मृत्यू प्रमाणपत्र अशा प्रक्रियांत त्यांचा वेळही गेला. परंतु सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही रक्कम काढण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने त्या हतबल झाल्या आहेत..Farmer Issue: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘प्रहार’चे कठपुतळी आंदोलन.दरम्यान, रंजना यांनी महागाव तहसील कार्यालयात तहसीलदारांसमोर आपली व्यथा मांडली. “शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही जर कुटुंबाला न्यायासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल, तर या योजनांचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बँक प्रशासनाला निर्देश देत या संदर्भात योग्य भूमिका घेण्यास सांगावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी संघटनांनी केली आहे..संतापाची भावनायवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असताना, आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना भेडसावणाऱ्या अडचणींमुळे शासनाच्या मदत योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन रोषाचे वातावरण तयार झाले आहे. शेतकरी कुटुंबांना केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष आणि वेळेत मदत मिळणे गरजेचे असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.