Parbhani News: खुल्या बाजारातील दरात सुधारणा झाली असून, कापसाला सरासरी ८ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहेत. त्यामुळे सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) कापूस खरेदीला ब्रेक लागला आहे. .परभणी व हिंगोली जिल्ह्यांत मंगळवार (ता.२०) पर्यंत सीसीआयच्या १४ केंद्रांवर ९ लाख ३८ हजार २२५ क्विंटल, तर खासगी व्यापाऱ्यांकडून ३ लाख १५ हजार २४० क्विंटल खरेदी झाली. या दोन जिल्ह्यांत सीसीआय व खासगी मिळून १२ लाख ५३ हजार ७१५ क्विंटल कापूस खरेदी झाली.बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केला आहे. त्यामुळे यंदा कापूस खरेदी हंगाम लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे..Cotton Price : कापूस दर स्थिरावले, तसेच काय आहेत सोयाबीन, मका, शेवगा आणि तूरीचे आजचे बाजारभाव .परभणी जिल्ह्यात ११ लाख १५ हजार क्विंटल कापूस खरेदीपरभणी जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी मिळून ११ लाख १५ हजार ९५ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताडकळस या १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत ७४ हजार ९३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४६ हजार ९०८ शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस विक्रीस घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली..जिल्ह्यातील ४६ जिनिंग कारखान्यांमध्ये ८ लाख ६ हजार ४२३ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल ७७१० ते ८०६० रुपये दर मिळाले. खासगी व्यापाऱ्यांकडून परभणी जिल्ह्यातील १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत २६ जिनिंग कारखान्यामध्ये ३ लाख ८ हजार ७२ प्रति क्विंटल कापूस खरेदी झाली असून, प्रति क्विंटल ६७०० ते ८३०० रुपये मिळाले..Cotton Prices: कापूस दरवाढीचा लाभ अल्प शेतकऱ्यांना.हिंगोली जिल्ह्यात १ लाख ३८ हजार क्विंटल कापूस खरेदीहिंगोली जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी मिळून १ लाख ३८ हजार ६२० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयच्या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी हिंगोली, आखाडा बाळापूर, वसमत, जवळा बाजार या ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गतच्या सीसीआयच्या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी १३ हजार ४४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ६ हजार ६५९ शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली..या बाजार समित्यांतर्गत ५ जिनिंग कारखान्यांमध्ये १ लाख ३२ हजार ५२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल ७७१२ ते ८०६० रुपये दर मिळाले. खासगीमध्ये जिल्ह्यातील २ बाजार समित्यांमधील ३ जिनिंग कारखान्यामध्ये ६ हजार ५६८ क्विंटल कापूस खरेदी झाली असून, प्रति क्विंटंल ७२०० ते ८००० रुपये दर मिळाले, अशी माहिती राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली..सीसीआयची १४ केंद्रेया दोन जिल्ह्यांत सीसीआय केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान मोबाइल अॅपद्वारे सीसीआयच्या १४ केंद्रांवर कापूस विक्रीसाठी ८८ हजार ३७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ५३ हजार ५६७ शेतकऱ्यांची पडताळणी करुन त्यांना कापूस विक्रीस घेऊन येण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.