Pune News: वारंवार आदेश देऊनही टेमघर धरणग्रस्तांना वाढीव मोबदला न दिल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा भूसंपादन अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या जप्तीचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनावर ही नामुष्की आली आहे. .टेमघर धरणग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मोबदला न दिल्याने न्यायालयाने विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करून, पुढील दोन महिन्यांत हा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासन दिले..Dam affected families: मध्य वैतरणा धरणावर प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या.मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही मोबदला मिळू शकला नाही. जलसंपदा विभागाने राज्य सरकारकडे या निधीची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही तो न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने बुधवारी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या जप्तीचे आदेश काढले. त्यानंतर न्यायालयाच्या बेलिफसह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली..Dam-Affected Hunger Strike: धरणग्रस्तांचे दोन मे रोजी उपोषण.भूसंपादन अधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यालयातील अन्य खुर्च्या बाहेर आणून ठेवल्या. त्यानंतर भूसंपादन समन्वय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी या प्रकरणात गेल्या वेळीही शेतकऱ्यांशी संवाद साधत मध्यस्थी केली होती. पांढरे यांनी.बुधवारीही मध्यस्थी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा करून, महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार महामंडळाच्या कार्यालयात मोबदल्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे पांढरे यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.