Sludge Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Sludge Issue : गाळयुक्‍त खाडीमुळे चिरनेरवासी त्रस्‍त

Sludge Update : चिरनेर कळंबुसरे परिसरातील पाणी निचरा करणाऱ्या खाडीत सध्या गाळ साचला आहे.

Team Agrowon

Uran News : चिरनेर कळंबुसरे परिसरातील पाणी निचरा करणाऱ्या खाडीत सध्या गाळ साचला आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील खाडीतील गाळ लवकरात लवकर काढावा, अशी मागणी पूरग्रस्‍तांकडून करण्यात येत आहे.

चिरनेर अकादेवी डोंगरावरून येणाऱ्या पावसाचे पाणी हे चिरनेरच्या मध्यवर्ती नाल्यावाटे खाडीपात्रात मिसळते. या पावसाच्‍या पाण्याबरोबर गाळ, कचराही वाहून येत असतो. वर्षानुवर्षे वाहून ‍आलेला गाळ आणि कचऱ्याने येथील खाडीच्‍या पात्राची खोली कमी झाली आहे. त्‍यातच चोहोबाजूने झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

काही ठिकाणी खाडीचे पात्र अगदी लहान झाल्‍याचे दिसून येत आहे. त्यामुळे भरतीच्‍या वेळी येणारे पाणी हे थेट गावाच्या दिशेने पुढे येते. तसेच पाण्याचा निचराही लवकर होत नाही. त्यातच येथील डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. त्‍यामुळे पावसाचे पाणी नाल्‍यातून वाहून खाडीमध्ये मिसळते.

मात्र, खाडीचे पात्र गाळामुळे भरले असल्‍याने पाण्याचा योग्‍य निचरा होत नाही. त्यामुळे येथील गाव-वाड्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे. अनेक वेळा या पूरस्थितीचा सामना चिरनेरवासीयांना करावा लागला आहे. प्रत्येक वर्षी पुराच्या स्थितीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्यावाटे गाळ आणि कचरा जाऊन खाडीचे पात्र गाळाने भरले आहे. पूर्वी शेतीसाठी यातील गाळ काढला जात होता. मात्र गेल्‍या काही वर्षांपासून त्‍याकडे दुर्लक्ष झाल्‍याने खाडीचे पात्र लहान झाले आहे.
अनंत नारंगीकर, सामाजिक कार्यकर्ते
खाडीपात्र गाळाने भरले असेल तर लवकरात लवकर त्यावर उपाययोजना केली जाईल.
उद्धव कदम, तहसीलदार, उरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT