Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर ; आठ हजार हेक्टरवरील पीक नष्ट

Heavy Rain In Assam : आसाममधील पूरस्थिती गंभीर बनल्याने सुमारे १.९० लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. गेल्या चोवीस तासांत एकाचा मृत्यू झाला आहे.
Assam Flood
Assam FloodAgrowon
Published on
Updated on

Assam Rain Update : आसाममधील पूरस्थिती गंभीर बनल्याने सुमारे १.९० लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. गेल्या चोवीस तासांत एकाचा मृत्यू झाला आहे. पर्वतीय भागात सतत पाऊस पडत असल्याने बहुतांश नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. राज्यातील विविध भागांत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पाणीपातळी वाढल्याने ब्रह्मपुत्र नदीवरची गुवाहाटी आणि जोरहाटच्या निमतीघाट नौका सेवा निलंबित केली आहे. आसाम राज्य आपत्कालीन व्यवस्थापन (एएसडीएमए) ने म्हटले, शिवसागर जिल्ह्यातील डेमो येथे एका जणाचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे यावर्षी पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पंधरावर पोचली आहे. सरकारच्या निवेदनात म्हटले, आसामच्या १७ जिल्ह्यात पूरजन्य स्थिती आहे आणि त्यामुळे १ लाख ९० हजार ६७५ जणांना फटका बसला आहे. सर्वाधिक फटका लखीमपूर जिल्ह्याला बसला असून त्यात ४७,३३८ जणांना बसला आहे.

Assam Flood
Assam Flood : आसाममध्ये एक लाखापेक्षा जास्त नागरिक बाधित

त्यानंतर धेमाजी येथील ४०,९९७ जणांना पुरामुळे फटका बसला आहे. राज्यात एकूण साडेचारशे जण दोन मदत छावण्यात राहत आहेत तर ४५ मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. एएसडीएमएने म्हटले, की स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकाने विविध पूरग्रस्त भागात मदतकार्य राबविले आहे.

दिब्रुगड, धुब्री, तेजपूर आणि जोरहाट येथील निमतीघाट येथे ब्रह्मपुत्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बेकी, जिया-भराली, दिसांग, दिखौ आणि सुबनसिरी नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत.

Assam Flood
Tea Producer Assam : आसाममधील छोट्या चहा उत्पादकांच्या सशक्तीकरणाचा प्रयत्न

राज्यातर्गंत नौकासेवा स्थगित

आसामतर्गत सुरू असलेली नौका सेवा स्थगित करण्यात आली आहे. जल परिवहन विभागाने म्हटले, की ब्रह्मपुत्रेची वाढलेली पातळी पाहता गुवाहाटीत मंगळवारपासून नौका सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच वरच्या भागात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढत असून निमतीघाट आणि माजुलीदरम्यानची बोटसेवा स्थगित केली आहे.

सध्याच्या पुरामुळे राज्यातील ८०८६.४० हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे. तसेच १,३०,५१४ जनावरांना फयका बसला असून त्यात ११,८८६ कोंबड्यांचा समावेश आहे. पावसामुळे आणि पुरामुळे रस्ते, पूल, विजेचे खांब, शाळांसह अन्य पायाभूत सुविधांची बरीच हानी झाली आहे. बारपेटा, बिस्वनाथ, धुब्री, लखीमपूर, मोरीगाव, नलबारी, शिवसागर, सोनीतपूर, तिनसुकीया आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com