Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त वाणांवर संशोधन सुरू : डॉ. मणी

नैसर्गिक शेतीच शाश्‍वत शेती आहे.त्यासाठी केंद्र व राज्‍य सरकार यास प्रोत्‍साहन देत आहे. विविध पिकांचे कीड व रोग प्रतिकारक वाण विकसित करण्यावर संशोधन आहे.

Team Agrowon

Parbhani News : नैसर्गिक शेतीच शाश्‍वत शेती आहे.त्यासाठी केंद्र व राज्‍य सरकार यास प्रोत्‍साहन देत आहे. विविध पिकांचे कीड व रोग प्रतिकारक वाण विकसित करण्यावर संशोधन आहे. हे वाण सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्‍त ठरतील.

चांगल्या आरोग्यासाठी टप्प्‍या-टप्‍प्‍याने रासायनिक शेती कमी करून सेंद्रिय शेती खालील क्षेत्र वाढवावे लागेल‌, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रिय शेती प्रशिक्षणाच्‍या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर,प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ.डब्ल्यू. एन. नारखेडे, सेंद्रिय शेती संशोधन केंद्राचे मुख्य संशोधक डॉ. आनंद गोरे, हदगाव येथील प्रगतशील शेतकरी सुषमा देव, राजेंद्र पाटील, संजय देशमुख आदींची उपस्थिती होती.

या प्रशिक्षणात सेंद्रिय शेतीमधील पीक लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, भाजीपाला व फळपिकांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, अवजारांचा कार्यक्षम वापर, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, पशुधन व्यवस्थापन, सेंद्रिय प्रमाणीकरण, सेंद्रिय शेतमाल विक्री व बाजारपेठ व्यवस्थापन आदी विविध विषयांवर राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था येथील तज्ज्ञांनी माहिती दिली.

सेंद्रिय शेती यशस्वीरीत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले. या प्रशिक्षणाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ राज्यभरातील शेतकऱ्यांनी घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Market: उसाला मागे टाकत मक्यापासून इथेनॉल केंद्रस्थानी

Farmer Crisis: ‘नुकसान झालंय, पण हाताश होणार नाही; रडणं नामंजूर’

Import Duty: भारतावर प्रचंड आयातशुल्क लादणार

Crop Loan Distribution: आंबेगावात ९४७६ शेतकऱ्यांना ६६.५१ कोटींचे पीककर्ज वाटप

Sugarcane Price Hike: हरियाना सरकारकडून ऊस दरात १५० रुपये वाढ

SCROLL FOR NEXT