Agricultural Science Center Konkan : कोकणातून काळ्या तिळाचे मोठे उत्पादन घेतले जायचं. परंतु, मागच्या काही वर्षात कोकणातून काळा तीळ कमी होत चालला होता. दरम्यान कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने काळ्या तिळावर संशोधन केले आहे. १०३ वर्षे कार्यरत असलेल्या शिरगाव संशोधन केंद्रातून काळ्या तिळावर हा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. पाच जिल्ह्यात याची चाचणी पूर्ण झाली असून, यावर्षी शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.
कोकणात लांबड्या काळ्या तीळावर ३ वर्षांपासून संशोधन सुरू होते. कृषिखाते, कृषी विज्ञान केंद्र पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये या काळ्या तिळावर शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी घेण्यात आली. लांबड्या काळ्या तिळाचे तपासणीसाठी प्रयोग घेण्यात आले. यावर्षी ही जात शेतकऱ्यांसाठी प्रसारित होण्याची शक्यता आहे.
याबाबत डॉ. विजय दळवी म्हणाले की, "कोकणात पूर्वीपासून काळ्या लांब तिळाची जात होती; पण त्यावर उत्पादन कमी झाले. त्यामुळे घरगुती जुने घाणेही बंद पडले. शेतकरी काळ्या तिळाचे उत्पादन कमी झाल्यामुळे स्वच्छ तेलही काळाच्या पडद्याआड झाले. शेतकऱ्यांकडून काळ्या तिळाची जात मिळवून त्यातील निवडक तिळावर केंद्रातून संशोधन करण्यात आले. पाच जिल्ह्यांत घेण्यात आलेल्या चाचणीतून ५०० किलो उत्पादन मिळण्याची शक्यता आहे". असे डॉ. दळवी यांनी सांगितलं.
डॉ. दळवी पुढे म्हणाले की, "जिल्ह्यात माकडाच्या उपद्रवाशी शेतकरी झुंजत आहे. त्यावर कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी वरकस शेती करणे सोडले आहे. त्यामुळे दुर्लक्षित पिकांकडे शेतकऱ्यांकडून उत्पादन होत नाही; मात्र या काळ्या तिळाचे डोंगरउतारावर जमिनीत उत्पादन केल्यास माकडांचा त्रास होत नाही. त्यामुळे काळ्या तिळाची शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. असे दळवी यांनी माहिती दिली.
तिळावर संशोधन केलेली पहिलीच जात
कृषी संशोधन केद्राने विकसित केलेल्या या काळ्या तिळाच्या नवीन जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४० ते ४२ टक्के असणार आहे. ही जात ९० ते १०० दिवसांत तयार होईल. तेल खाद्यासाठी आणि औषधांसाठीही वापरात येणार आहे. पूर्वी याची पेंड ही जनावरांना खाण्यासाठी देत होते. काळ्या तिळाची संशोधन केलेली पहिलीच जात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.